आरोग्य

व्हायरल फिव्हर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या…

बदलत्या हवामानात लोक अनेकदा आजारी पडतात. थोडासा निष्काळजीपणा देखील ताप, खोकला आणि इन्फेक्शनचा धोका वाढवतो. व्हायरल फिव्हर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये काय फरक आहे.

व्हायरल फिव्हर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे येणाऱ्या तापातील फरक ओळखण्यात लोक अनेकदा चुका करतात. या दोघांची लक्षणं तुम्हाला अगदी नॉर्मल वाटतील. पण दोघांमध्ये खूप फरक आहे.

व्हायरल फिव्हर हा थोड्या काळासाठी येतो. यात सर्दी आणि खोकला होऊ शकतो. व्हायरल फिव्हर कोणत्याही तपासणीशिवाय स्वतःहून बरा होऊ शकतो. मात्र तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये हा ताप वेगाने पसरतो. यासाठी अँटीबायोटिक्सची आवश्यकता नसते. थंड हवामान आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती ही व्हायरल फिव्हर होण्याची प्रमुख कारणं मानली जातात.

काही व्हायरल फिव्हर हे धोकादायक देखील असू शकतात. यामध्ये स्वाइन फ्लू, कोविड आणि डेंग्यू यांचा समावेश आहे. व्हायरल फिव्हरपेक्षा बॅक्टेरियल इन्फेक्शन हे जास्त काळ राहतं. यामध्ये घसा खवखवणं, छातीत दुखणं, कावीळ, लघवी करताना जळजळ होणं, रक्त येणं इत्यादी लक्षणं दिसतात. याच्या तपासणीसाठी चाचण्या करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अँटीबायोटिक्सही दिले जातात.

बॅक्टेरियल इन्फेक्शन फार लवकर पसरत नाही, त्याचा प्रसार होण्याची शक्यता खूप कमी असते. तपासणीनंतर, विशिष्ट अँटीबायोटिक्सची आवश्यकता असते. बॅक्टेरियल इन्फेक्शन दूषित पाणी पिण्यामुळे, दूषित अन्न खाण्यामुळे, संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने किंवा लसीकरण न केल्याने होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

19 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

19 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

1 दिवस ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

2 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

2 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

2 दिवस ago