आरोग्य

पायऱ्या चढण्या-उतरण्याचे मिळतात एकापेक्षा एक फायदे, जिममध्ये जाण्याची पडणार नाही गरज

आजकाल बऱ्याच लोकांकडे एक्सरसाईज करण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांची ईच्छा नसते. तसेच काही लोक कामाच्या वाढत्या ताणामुळे फिटनेसची योग्य ती काळजी घेत नाहीत. अशात आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही फिटही राहू शकता आणि सोबतच हृदयरोग, ब्लड प्रेशर कंट्रोल आणि डायबिटीसचा धोकाही कमी करू शकता. हा उपाय म्हणजे पायऱ्या चढणं-उतरणं. १० मिनिटे पायऱ्या चढणं-उतरणं केलं तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

जर तुमच्याकडे जिममध्ये जाऊन अर्धा तास कार्डिओ एक्सरसाईज करण्याचा वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या घरात १० ते १५ मिनिटं हाय इन्टेन्सिटीने पायऱ्या चढूनही कॅलरी बर्न करू शकता. ही एक अशी एक्सरसाईज आहे, ज्यासाठी फार वेळही लागत नाही आणि यानं वेगानं कॅलरी बर्नही होतात. पायऱ्या चढल्यानं मांड्या, पोट आणि पायांच्या मांसपेशी मजबूत होतात. सोबत फॅट बर्नही होतं.

हृदयासाठी फायदेशीर

पायऱ्या चढल्यानं ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं आणि सोबतच गुड कोलेस्टेरॉलचं प्रमाणही शरीरात वाढतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळेल.

मानसिक आरोग्य चांगलं राहत

पायऱ्या चढणं आणि उतरणं ही एक हाय इन्टेन्सिटी एक्सरसाईज असते आणि कोणतीही फिजिकल एक्सरसाईज केल्यानं मेंदुमध्ये हॅप्पी हार्मोन रिलीज होतात व मडू चांगला राहतो.

डायबिटीस कंट्रोल

पायऱ्या चढणं आणि उतरण्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते आणि याने मेटाबॉलिज्म वाढतं. ज्यामुळे डायबिटीसचा धोका कमी केला जाऊ शकतो.

फप्फुसांसाठी फायदेशीर

पायऱ्या चढणं उतरणं केल्यानं फुप्फुसांची क्षमता वाढते आणि श्वसन तंत्रही चांगलं राहतं. ज्यामुळे श्वसनांसंबंधी समस्याही होत नाहीत. इतकंच नाही तर पायऱ्या चढल्या उतरल्यानं एनर्जी लेव्हलही वाढते आणि थकवा दूर होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

9 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

24 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago