आरोग्य

डेंग्यू झाला असेल तर रामबाण उपाय ठरतं हे फळ, जाणून घ्या याचे फायदे

डेंग्यू एक असा आजार आहे जो डास चावल्यामुळे होतो. हा आजार डेंग्यू व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस डासांच्या शरीरात राहतो आणि डास आपल्याला चावला तर व्हायरस आपल्या शरीरात येतो. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे डेंग्यूची लक्षणं इन्फेक्शन झाल्यावर 3-14 दिवसांमध्ये दिसतात. काही केसेसमध्ये डेंग्यू गंभीर असतो. गंभीर डेंग्यूमध्ये जास्त ब्लीडिंग, लो ब्लड प्रेशर आणि ऑर्गन फेलिअरसारख्या समस्याही होतात.

डेंग्यू बरा करण्यासाठी रूग्णांना खासप्रकारची डाएट फॉलो करावी लागते. ज्यात वेगवेगळी फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. यातीलच एक खास फळ म्हणजे कीवी. हे फळं असतं छोटं पण याचे फायदे खूप जास्त असतात. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशिअम, फायबरसारखे पोषक तत्व असतात. याने डेंग्यूची लक्षणं कमी करण्यास मदत मिळते.

कीवीमध्ये फायबर असतं जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं, डेंग्यूमध्ये पचनासंबंधी समस्या होते. जसे की, बद्धकोष्ठता. अशात कीवीचं सेवन केलं तर ही समस्या दूर होते. डेंग्यूमुळे शरीरात सूज येते, ज्यामुळे वेदना आणि थकवा येतो. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई च्या मदतीने ही समस्या दूर होते.

कीवी खाण्याचे फायदे

पचन चांगलं होत: कीवीमध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. याने बद्धकोष्ठता रोखण्यास मदत मिळते आणि पचन तंत्र चांगलं राहतं.

इम्यूनिटी बूस्टर: कीवीमध्ये व्हिटॅमिन सी असतं. जे एक शक्तीशाली अ‍ॅंंटी-ऑक्सिडेंट आहे. व्हिटॅमिन सीमुळे इम्यून सिस्टीमही मजबूत राहतं. याने इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळते.

हृदय चांगलं राहत: कीवीमध्ये पोटॅशिअम भरपूर असतं. जे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं. पोटॅशिअम हृदयसाठी महत्वाचं आहे आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास याने मदत मिळते.

कॅन्सरचा धोका कमी होतो: कीवीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे कोशिकांचं नुकसान होण्यापासून रोखतात. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.

त्वचा आणि केस: कीवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर असतं. जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन बनवण्यास मदत करतं. याने तुमची त्वचा तरूण दिसते तर व्हिटॅमिन ई मुळे केस निरोगी आणि चमकदार दिसतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

6 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

6 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

12 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

12 तास ago