आरोग्य

लवंग आणि लिंबाचं पाणी, आरोग्यासाठी ठरते जादूई! पाहा तिखट-आंबट चवींचा खास उपाय

लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवतात आणि सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे देतात. त्यात जर या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर फायदे दुप्पट होतात. या फायद्यांबाबत आयुर्वेद डॉक्टर सलीम जैदी यांनी एका यूट्यूब व्हिडिओतून माहिती दिली आहे. चला तर पाहुयात काय होतात फायदे.

लिंबू आणि लवंग एकत्र केल्यावर एक प्रभावी घरगुती उपाय तयार होतो. रोज उपाशीपोटी या गोष्टी खाल्ल्या तर शरीरात आपल्याला अनेक बदल बघायला मिळतील.

टळतो आजारांचा धोका

डॉक्टर सांगतात की, लिंबामध्ये व्हिटामिन सी आणि सिट्रिक अ‍ॅसिड असतं, जे बॅक्टेरिया आणि व्हायरससोबत लढण्यास मदत करतं. लवंगामध्ये यूजिनॉल नावाचं तत्व असतं. जेव्हा लिंबू आणि लवंग एकत्र येतात तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. पावसाळ्यात लवंग वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव करते.

पचन सुधारतं

जर आपल्याला नेहमीच पचनासंबंधी समस्या राहते, पोट बरोबर साफ होत नसेल, गॅस होत असेल तर लिंबू आणि लवंगचं कॉम्बिनेशन फायदेशीर ठरू शकतं. या दोन्ही गोष्टींमुळे पोट साफ होतं आणि गॅसची समस्याही दूर होते.

जॉइंट्सचं दुखणं होईल दूर

लवंग आणि लिंबामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. लवंगातील यूजिनॉलमध्ये सूज कमी करण्याची क्षमता असते. तेच लिंबातील व्हिटामिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्सनं सूज कमी होते. अशात या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर जॉइंट्समधील वेदना, सूज कमी होण्यास मदत मिळते.

फुप्फुसांसाठी फायदेशीर

लवंग आणि लिंबाच्या चहानं किंवा पाण्यानं घशाला आराम मिळतो आणि रेस्पिरेटरी हेल्थ सुधारते. सर्दी-पडसा, खोकला, घशातील खवखव, श्वासासंबंधी समस्या दूर करण्यासही या गोष्टींनी मदत मिळते.

कसा कराल वापर?

लवंग आणि लिंबूचा वापर आपणं दोन वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता.

लवंग आणि लिंबाचा चहा

हा खास चहा बनवण्यासाठी १ कप पाण्यात २ ते ३ लवंग टाकून ५ मिनिटं उकडा. पाणी चांगलं उकडल्यावर त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका. हवं तर यात थोडं मधही घालू शकता. हा चहा रोज सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता.

लवंग आणि लिंबाचं पाणी

हे पाणी बनवण्यासाठी १ लीटर पाण्यात एका लिंबाचे तुकडे आणि ५ ते ६ लवंग टाकून रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी दिवसभर हे पाणी थोडं थोडं पित रहा. प्रेग्नेंट महिला, स्तनपान करणाऱ्या महिला किंवा अ‍ॅसिडिटी, ब्लीडिंगची समस्या आहे त्यांनी हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

4 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

5 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

5 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

5 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

5 दिवस ago