आरोग्य

कोथिंबिरीचा रस आरोग्यासाठी फायदेशीर

भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने मसाले वापरले जातात. विशेषत: कोथिंबीर आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कोथिंबीर हा एक अतिशय उपयुक्त पदार्थ असून, त्यामुळे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते. कोथिंबिरीच्या पानांपासून बनविलेला कोथिंबिरीचा रस अनेक आरोग्यदायी फायदे देतो. कोथिंबिरीच्या रसाला आपण संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा भाग बनविले पाहिजे.

कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे

1) कोथिंबिरीचा रस प्यायल्याने आतडी निरोगी राहतात आणि पचनक्रिया सुधारते. गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.

२) या रसामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडतात.

३) कोथिंबिरीच्या रसामध्ये दाहकविरोधी आणि जीवाणूवाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरमे कमी होतात आणि त्वचा चमकदार होते.

४) कोथिंबिरीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी व के यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे शरीराला आजाराचा सामना करण्यास बळ मिळते.

५) या रसाच्या सेवनाने प्री-डायबेटीज आणि इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

6) तसेच, कोथिंबिरीच्या रसाने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करता येतो. हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य चांगले राहते.

७) हा रस प्यायल्याने चयापचय क्रिया व पचनक्रिया सुधारते. जर कोथिंबिरीचा रस संतुलित आहाराचा भाग बनविल्यास वजन कमी करण्यासाठीही मदत करतो.

८) ज्या लोकांना निद्रानाश किंवा झोपेशी संबंधित समस्या असेल, त्या रसाच्या सेवनाने त्या लोकांची झोपेची गुणवत्ता सुधारते.

९) तसेच ज्या लोकांना संधिवात, स्नायूंच्या दुखण्याचा त्रास असणाऱ्यांना या रसामुळे आराम मिळतो.

नियमित कोथिंबिरीचा रस पिण्यामुळे होणारे त्रास 

ॲलर्जीची लक्षणे: कोथिंबीर रसाच्या नियमित सेवनाने त्वचेवर पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोट खराब होणे यांसारखी ॲलर्जीची लक्षणे दिसू शकतात.

कमी रक्तदाब: या रसाच्या नियमित सेवनाने रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

अतिप्रमाणात डिटॉक्सिफिकेशन: या रसाच्या नियमित सेवनाने अतिप्रमाणात डिटॉक्सिफिकेशन होऊ शकते. त्यामुळे विषाक्त घटकांसह शरीरास उपयुक्त असलेली काही आवश्यक खनिजे किंवा इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा कमी होऊ शकतात.

किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम: कोथिंबीर हा लघवीचे प्रमाण वाढविणारा पदार्थ आहे. कोथिंबिरीचा रस किडनीला अधिक पाणी आणि मीठ उत्सर्जित करण्यास उत्तेजित करतो. त्यामुळे किडनीवर ताण येतो आणि तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होऊ शकतात.

कोथिंबिरीचा रस कसा बनवावा

साहित्य

एक कप ताजी कोथिंबिरीची पाने

एक कप अननसाचे तुकडे

एक चमचा लिंबाचा रस

१ इंच आल्याचा तुकडा

१ कप नारळ पाणी किंवा साधे पाणी

बर्फाचे तुकडे

कृती

कोथिंबिरीची पाने, अननस, आले व नारळाचे पाणी एकत्र करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा. त्यानंतर हा रस गाळून घ्या (आवश्यकता असेल तर). त्यात लिंबाचा रस टाका आणि वरून बर्फाचे तुकडे टाका. अशा प्रकारे तुम्ही कोथिंबिरीचा रस तयार करू शकाल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

13 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

14 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

14 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

14 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

14 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago