पायांना भेगा पडणे ही एक अगदी कॉमन समस्या आहे. बहुतेक सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात हा त्रास होतोच.
पायांना भेगा पडण्याची अनेक कारणे आहेत. वजन वाढलेले असणे हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. पावलांची त्वचा नाजूक असते. जास्त वजनाचा भार त्यावर पडला की तिथे भेगा पडतात. अशा भेगांमुळे चालताना पावले दुखणे तसेच भेगांमधून रक्त येणे असा त्रास होऊ शकतो. याशिवाय थंडी आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे देखील पावलांना भेगा पडतात.
पावलांच्या भेगांमुळे शरीरात इन्फेक्शन होण्याचा देखील धोका असतो. पायाला पडणाऱ्या भेगा या प्लांटर सोरायसिस मुळे देखील असू शकतात.
पायांना भेगा पडणे म्हणजे नक्की काय?
पायांची टाचेकडची त्वचा तसेच अंगठ्याच्या बाजूची त्वचा थंडीत किंवा पावसाळ्यात कोरडी पडते. त्यामुळे तेथे चिरा पडून त्वचेचा आतील स्तर दिसू लागतो. त्यालाच पायांना भेगा पडणे असे म्हणतात. क्वचित काही जणांना संपूर्ण पावलावर देखील भेगा पडतात. ज्यांची त्वचा जास्त कोरडी असते त्यांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो.
पायांना भेगा पडण्याची प्रमुख कारणे
१) कोरडी त्वचा
त्वचा कोरडी असणे हे पायांना भेगा पडण्याचे सर्वात प्रमुख कारण आहे. अशी त्वचा नाजूक असते त्यामुळे ती लवकर फाटते. थंडी व पावसाळ्याच्या दिवसात त्वचेला जास्त कोरडेपणा येऊन जास्त त्रास होतो.
२) मधुमेह
पायांना भेगा पडण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे मधुमेह. एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला आणि त्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहत नसेल तर पायाकडे होणाऱ्या रक्ताभिसरणावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पायाची त्वचा कोरडी पडत जाते आणि पावलांना भेगा पडतात. अशा पायांना ‘डायबेटीक फुट’ म्हणतात. मधुमेही व्यक्तीने आपल्या पावलांची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण अशा पावलांना झालेल्या जखमा आणि भेगांमधून पसरणारे इन्फेक्शन लवकर बरे होत नाही.
३) थायरॉईड
शरीरात थायरॉइड हार्मोनचे असंतुलन असेल तर पावलांना भेगा पडण्याचे प्रमाण वाढते.
४) आंघोळ करताना खूप गरम पाणी वापरले तर त्वचा कोरडी पडून पावलांना भेगा पडतात.
५) द्रवरुप आहार आणि पाणी यांचे सेवन कमी प्रमाणात करण्यामुळे देखील शरीरात कोरडेपणा येऊन पावलांना भेगा पडतात.
६) योग्य पोषक आहार न घेणे, जंग फूडचे अतिरिक्त सेवन आणि स्थूलता यामुळेदेखील पावलांना भेगा पडतात.
७) अनवाणी पायांनी चालण्यामुळे पावलांच्या भेगांचा धोका वाढतो. अनवाणी पायांनी लहान खडे, काटे असणाऱ्या रस्त्यांवर जाऊ नये.
८) सोरायसिस किंवा संधिवात अशा आजारांमुळे देखील पायांना भेगा पडू शकतात.
पायांना भेगा पडत असतील तर करायचे इतर उपाय
१) पायांना भेगा पडत असतील तर नियमित पणे पायमोजे घालण्याची सवय लावून घ्या.
२) घरामध्ये देखील महू स्लीपर वापरा.
३) बाहेरुन आल्यावर पाय स्वच्छ धुवा.
४) आठवड्यातून एक दिवस गरम पाणी करुन त्यात पाय बुडवून बसण्याची सवय लावून घ्या.
५) पायांना नियमितपणे चांगल्या प्रतीचे फुट क्रीम लावा.
पायांना भेगा पडत असतील तर आहार कसा असावा?
१) भरपूर पाणी पिणे.
२) आहारात फळे व पालेभाज्या यांचे प्रमाण जास्त असावे.
३) दूध, दही, तूप, अशा स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश असावा.
4) योग्य प्रमाणात मांसाहार करावा किंवा त्या प्रमाणात प्रोटीन घ्यावे.
५) रुक्ष व कोरडा आहार घेऊ नये.
६) जंक फूड तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळावे.
तर हे आहेत पायाच्या भेगांवर करण्याचे घरगुती उपाय. ह्यांचा लाभ जरुर घ्या.
परंतु ह्या उपायांनी ही जर भेगा कमी होत नसतील, तसेच वारंवार भेगांमधून रक्त येणे, चालताना पाय खूप जास्त दुखणे असा त्रास होत असेल तर मात्र तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मधुमेह असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा. आपल्या पावलांवरच तर आपण उभे असतो. त्यांची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
पायांना सतत पडणाऱ्या भेगाचे नेमके कारण शोधून त्यावर उपचार करणे आवश्यक असते. डायबीटीस, थायरॉईड ,सोरायसिस सारख्या आजारांचे हे एक लक्षण आहे .अशा केसेस मध्ये लक्षणापेक्षा आजारावर उपचार होणे आवश्यक असते.
(सोशल मीडियावरुन साभार)
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…
बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…