Compressed by jpeg-recompress
चांगल्या आरोग्यासाठी डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली असणं गरजेचं असतं. डाएट मध्ये दही, ताकाचा समावेश करून आपण पचनक्रिया चांगली ठेवू शकतो. काही जण ताक पिणं पसंत करतात, तर काही जणांना दही आवडतं.
दही एक डेअरी प्रोडक्ट आहे. दही प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे आतड्या मध्ये गुड बॅक्टेरियाज वाढतात आणि डायजेशन चांगले राहण्यास मदत होते. यामुळे पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. शरीराचे तापमान मेंटेन राहते तर ताकाच्या सेवनाने डिहायड्रेशन कमी होते. जर शरीरात वॉटर लॉस जास्त झालं असेल, तर ताकाचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. ताकामुळे पचनक्रिया चांगली राहते. ताक करण्याासाठी दही घुसळले जाते, तेव्हा त्याची गुणवत्ता अधिक वाढते.
ताका मधील प्रोटीनचे स्टॅक्चर बदलते ज्यामुळे अन्न सहज पचते. दही नि ताक, हे दोन्ही पदार्थ तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात. वजन वाढवण्यासाठी दही फायदेशीर ठरतं, तर वजन कमी करण्यासाठी ताकाचे सेवन करावं. दह्याच्या तुलनेत ताकात कमीत कमी कॅलरीज असतात. दही प्रोबायोटिक्स प्रादन करते, तर ताक डिहायड्रेशन पासून बचाव करते. या दोन्हींमुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. या दोन्हीचे सेवन करताना क्वालिटी आणि क्वान्टिटीकडे लक्ष ठेवायला हवं.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या…
सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…
जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…
पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…
शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…
शिरूर: शिरूर शहरातील बाबुरानगर येथील एका खासगी रुग्णालयात हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया सुरू असताना एका विवाहित…