आरोग्य

कोणत्या समस्या असल्यावर अळशीच्या बियांचं करू नये सेवन

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात अळशीच्या बियांचा समावेश करण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. अळशीच्या बियांनी भलेही तुम्हाला वजन कमी करण्यास आणि डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळत असेल तरीही काही लोकांसाठी अशी बियांचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी अळशीच्या बियांचं सेवन करू नये.

बद्धकोष्ठतेची समस्या

अनेक समस्यांवर रामबाण उपाय असूनही अळशीच्या बीया बद्धकोष्ठतेच्या समस्येत फार नुकसानकारक आहे. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या नेहमीच होत असेल तर अळशीच्या बियांमुळे आतड्यांमध्ये अडथळा होऊ शकतो.

गर्भावस्थेत खाऊ नये

अळशी बीया या गरम असतात. त्यामुळे गर्भावस्था किंवा प्रेग्नेन्सी दरम्यान या बियांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. एक्सपर्ट सांगतात की, याने आई आणि बाळ दोघांनाही नुकसान होऊ शकतं. याच्या जास्त सेवनामुळे यातील एस्ट्रोजन गुण हार्मोनल असंतुलनचं कारण बनतात.

औषधांचा साईड इफेक्ट्स

जर तुम्ही डायबिटीस किंवा रक्त पातळ करण्याचं औषध घेत असाल तर अळशीच्या बियांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण यांनी औषधं प्रभावित होऊ शकतात. अशात गरजेचं आहे की, या बियांचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावं.

एलर्जीची समस्या

अळशीच्या बियांचं सेवन केल्याने अनेक लोकांना एलर्जीची तक्रारही होऊ शकते. जर तुम्हाला लो ब्लड शुगरची समस्या असेल तर या बियांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण याने पोटदुखी आणि घाबरल्यासारखं वाटणं अशी समस्या होऊ शकते.

लूज मोशन असल्यावर….

जर तुम्हाला नेहमीच लूज मोशनची म्हणजे जुलाब लागण्याची समस्या होत असेल तर अळशीच्या बियांचं सेवन टाळलं पाहिजे. याने लूज मोशनची समस्या अधिक वाढू शकते. तुम्हाला डायरियाही होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

21 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago