आरोग्य

शरीरात व्हिटॅमिन ई कमी झाल्यास होतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

शरीर निरोगी ठेवण्यात वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स खूप महत्वाचे ठरत असतात. वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सपैकी एक म्हणज व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई आपलं शरीर निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन ई एक पॉवरफूल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि जे आपल्या शरीराचा फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून बचाव करतं. मात्र, हे व्हिटॅमिन शरीरात जर कमी झालं तर शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

व्हिटॅमिन ई कमी झाल्याचे लक्षण

शरीरात व्हिटॅमिन ई कमी झालं किंवा पुरेसं व्हिटॅमिन ई मिळालं नाही तर मांसपेशी कमजोर होतात, दृष्टीसंबंधी समस्या होता आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. इतकंच नाही तर त्वचा कोरडी पडते, केसगळती होते आणि एनीमियाही होऊ शकतो.

तसेच स्थिती गंभीर असेल तर व्यक्तीला चालण्यात अडचण होते, मांसपेशींमध्ये कंपण होतं. व्हिटॅमिन ई कमी झाल्याने महिलांना प्रजननातही समस्या होऊ शकते. जर यावर वेळीच उपाय केला नाही किंवा उपचार घेतले नाही तर हृदयरोग आणि कॅन्सरसारख्य गंभीर समस्याही होऊ शकतात.

रोज किती व्हिटॅमिन ई ची गरज

14 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या पुरूष आणि महिलांना रोज साधारण १५ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई ची गरज असते. स्तनपान करणाऱ्या महिलांना रोज १९ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई ची गरज असते.

कशातून मिळवाल व्हिटॅमिन ई

हिरव्या पालेभाज्या

व्हिटॅमिन ई ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही नियमितपणे हिरव्या पालेभाज्यांचं सेवन केलं पाहिजे. बदाम आणि अक्रोडही व्हिटॅमिन ई चांगलं सोर्स आहेत. इतकंच नाही तर याने शरीराला इतरही अनेक फायदे मि्ळतात.

फळं

व्हिटॅमिन ई मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये एवोकाडो, कीवी, आंबे अशा फळांचा समावेश करावा. या फळांचं नियमितपणे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन ई मिळतं.

आणखी कशातून मिळेल हे व्हिटॅमिन

सनफ्लॉवर तेल, सोयाबीन तेल

मोहरीच्या बीया

बदाम

शेंगदाणे

बीट, पालक

भोपळा

लाल शिमला मिरची

व्हिटॅमिन ई कमी होण्याचं कारण

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे व्हिटॅमिन ई असलेल्या पदार्थांचं सेवन न करणं. त्याशिवाय ही समस्या अनुवांशिकतेमुळेही होते. तुमच्या कुटुंबात कुणाला ही समस्या असेल तर तुम्हालाही होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago