आरोग्य

चहासोबत ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका; परिणाम ऐकून धडकी भरेल

जगात करोडो चहा प्रेमी आहेत. चहा हे असे पेय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत. पण भारतातील सर्वात आवडता चहा म्हणजे दुधाचा चहा.

या चहामध्ये पाणी, आले, वेलची आणि दालचिनी वापरली जाते. अनेक जण दिवसातून दोन-तीन कप चहा पितात. चहासोबत अनेकांना बिस्किट, खारी, टोस्ट इत्यादी खायला आवडते. पण चहासोबत काही पदार्थांचे सेवन करणे टाळावे. चहासोबत या पदार्थांचे सेवन करणं टाळा. सकाळ असो वा संध्याकाळ, अनेक भारतीय घरांमध्ये नाश्त्यासोबत चहा पिणे ही एक परंपराच आहे. आणि बहुतेकवेळा नाश्त्याला तळलेले पदार्थ असतात. हे तळलेले पदार्थ आधीच आरोग्यासाठी हानिकारक म्हणून ओळखले जातात, परंतु चहासोबत ते खाल्ल्याने पचन आणि पोषक तत्वांच्या शोषणावर अधिक परिणाम होऊ शकतो.

चहा आणि पकोडे एकत्र खावे की नाही

योग्य प्रमाणात चहा पिणे हाणीकारक नाही पण त्यासोबतच तळलेले पदार्थ खाणे शरिरासाठी हाणीकारक ठरु शकतात. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतात जे लोह आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या अन्न स्रोतांसह सेवन केल्यास त्यांचे शोषण कमी होते. शिवाय, वारंवार गरम केलेल्या तेलात तळलेले पकोडे खाल्ल्याने ट्रान्स फॅटी अॅसिडचे उत्पादन होते,”

चहासोबत असे काही पदार्थ आहेत का जे टाळावेत

चहासोबत अनेकजण बिस्किटे आणि कुकीज खातात. ज्यामध्ये चरबी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.चहासोबत खाल्ला जाणारा आणखी एक लोकप्रिय नाश्ता म्हणजे समोसा ज्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते.ब्रेडसारखे इतर बेकरी उत्पादने देखील चहासोबत खाणे योग्य नाही कारण त्यात सोडियम, साखर आणि फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. मात्र आरोग्यदायी नाश्त्याच्या पर्यायांमध्ये तुम्ही ढोकळा, मखाना, चना चाट आणी खाकरा यासह रागी चिप्सचा समावेश करु शकता.

डेअरी प्रोडक्ट्स: चहासोबत दूध, पनीर किंवा मलई इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने चहामध्ये आढळणारे पॉलीफेनॉलचा परिणाम शरीरावर होत नाही.

लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे: चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.

कॅमोमाइल चहा: हा चहा त्याच्या गुणधर्मांसाठी खूप प्रसिद्ध आहे.

हळद आणि आल्याची चहा: सामान्य चहाला पर्याय म्हणून, हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. नियमित चहामध्ये काळी मिरी आणि वेलची पावडर घालूनही आरोग्यदायी बनवता चहा येतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

2 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

16 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

23 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

23 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

24 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

24 तास ago