आरोग्य

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यास ड्रिंक्स पिल्याने कमी वयातच येऊ शकतो हार्ट ॲटॅक

आजकाल कमी वयातच लोक वेगवेगळ्या हृदयरोगांचे शिकार होत आहेत. अशात १८ वयातील तरूणांमध्येही लठ्ठपणा आणि हाय कोलेस्टेरॉल सारख्या गंभीर समस्या बघायला मिळतात. पण ही विचार करण्यासारखी बाब आहे की, कमी वयात हाय कोलेस्टेरॉल किंवा हृदयरोगांचा धोका होण्याचं कारण काय आहे? तर याचं उत्तर असं आहे की, काही ड्रिंक्सच्या सेवनाने धमण्यांमध्ये वेगाने कोलेस्टेरॉल वाढतं आणि मग हळूहळू हृदयरोगांचा धोका वाढतो. अशात कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या या ड्रिंक्सबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

कोलेस्टेरॉल वाढवणारे ड्रिंक्स

आइसक्रीम ड्रिंक्स

आइसक्रीम सगळ्यांनाच आवडते. थंड आणि गोड आइसस्क्रीम वेगवेगळ्या प्रकारची मिळते. बाजारात आइसस्क्रीम ड्रिंकही मिळतात. यांच्या सेवनाने बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वेगाने वाढू लागतं. जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसतात.

मलाई-लोणीवाले ड्रिंक्स

केसर मलाई दूध, रबडी, लस्सी आणि छास टेस्टी बनवण्यासाठी अनेकदा दुकानांमध्ये मलाई आणि लोण्याचा अधिक वापर केला जातो. पण यांचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं.

हाय फॅट मिल्क

हाय फॅट मिल्कचं सेवन शरीरात फॅट आणि कोलेस्टेरॉल वाढवू शकतं. हाय फॅट तत्व धमण्यांमध्ये चिकटतात आणि यामुळे पुढे जाऊन ब्लॉकेजचा धोका वाढतो.

चहा आणि कॉफी

चहा आणि कॉफीमुळे हाय कोलेस्टेरॉलचा धोका अधिक वाढतो. कॉफीमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं, पण यात डायटरपीन तत्व असतं जे कोलेस्टेरॉलचं पचन करणाऱ्या पदार्थांचं उत्पादन कमी करतं. ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतं.

खोबरं आणि काजूचे ड्रिंक्स

खोबरं आणि काजूपासून तयार ड्रिंक्स इतके घट्ट असतात की, रक्तात शुगर वाढतात. सोबतच यानी फॅटचे कणही वाढतात, जे कोलेस्टेरॉल वाढण्याचं कारण ठरतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

8 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

8 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

8 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

12 तास ago