आरोग्य

तळपायांची, हाताची सतत आग होण्याची कारणे व उपाय

कारणे

१)नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास.

२)मधुमेहाची शक्यता असल्यास.

३)व्हिटँमीनबी १२ ची कमी.

४)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.

५)लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास.

६)थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास

७)रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास.

८) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.

९)फोलिक अ‍ॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.

१०)बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही.

११)मद्यपानाचे व्यसन.

१२)किडनी संबंधित आजार.

१३)एखाद्या किटकाचा दंश.

उपाययोजना

१)गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते.

२)कैलास जीवन लावून माँलीश केल्यास.

३)एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते.हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.

४)दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.

५)दोन चमचे अँपलव्हेनिगर गरमपाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो.

६)पायाला कोकम तेल लावायच ! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण खुप घट्ट असत हे तेल, ह्या तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध.

७)कोहळा, पाव किलो साल काढुन,पांढरा दुधी पाव किलो साल काढुन,आवळा गर पाव किलो, आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.

८)शतधौत घ्रुत पायाला लावत जा.

९)धनेजीरे पाणी पीत जा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago