आरोग्य

खोकला व त्यावरील प्रभावी उपाय

हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्यावे. असे केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो. खोकला बरा होतो.

आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो.

लसुण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात ॲन्टीबॅक्टेरियल गुण असतात. लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात. याने गळ्याला शेक बसतो व बरं वाटतं.

काळे मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

पिंपळी गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.

खोकला बरा होत नसेल, तर नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून याने छातीला मालिश करावे, याने कफ मोकळा होतो व बरं वाटते.

ज्येष्ठमध एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली की, ज्येष्ठमध काडी चघळल्यास ढास जाते, बरं वाटते. किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

पुदिना पाने व तुळस या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहेत. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले की एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे. याने कफ मोकळा होतो व बरं वाटतं.

खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते, झोप लागत नाही. अशा वेळी पाव चमचा जिरेपूड नि पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात.

सर्दी व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्यावे व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा. संक्रमण दूर होतील

खोकला बरा होत नसेल, तर चार वेलदोडे व तितकीच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

नुसती कोरडी ढास लागली असेल, तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्यावे. पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घ्यावे.

सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे, आटवून अर्धा करावे. मग कोमट करून घ्यावे. याने आराम मिळतो.

खोकला, कफ, सर्दी वर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.

खोकल्यावर सुंठीची पावडर अर्धा चमचा + पिंपळी चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

खोकला झाल्यास बडीशेप व खडीसाखर खावी.

एक चिमूटभर काताची पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.

खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच, सहा मनुका घालून खावे.

खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावी. 

खोकला बरा होत नसेल, तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे. दिवसातून तीन, चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.

कोरडा खोकला झाल्यास खसखशीची खीर खावी. मुठभर खसखस तुपात भाजून घ्यावी. मग दूधामध्ये शिजवून घ्यावे व गरम गरम प्यावे. साखर आवडीनुसार मिसळून घ्यावे.

डांग्या खोकल्यावर तुरटी कुटून गरम करून घ्यावे. मग त्या त्या पाणी मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटी शिल्लक राहते. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे.

तिळाचे तेल कोमट करून प्यावे.

बकुळीची फुले ओंजळभर + सोनचाफ्याची ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्यावे.

अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.

एक कप दूधामध्ये लसणाच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे.

ज्येष्ठ मध + खडीसाखर चघळावी.

कोरफडीची पाने भाजून घ्यावे. त्यांचा रस काढून घ्यावा. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे.

भिमसेन कापूर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

खोकला झाल्यास तुळशीची पाने ठेचून व गरम करून छाती शेकावी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

11 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

11 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

11 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

11 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

11 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

11 तास ago