शिरूर तालुका

व्हिसेरा उशिरा जमा प्रकरण: चौकशीची मागणी होताच पोलीस अधिक्षक कार्यालयात हालचाल सुरू, सुत्रांची माहीती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुचर्चित खुनप्रकरणातील व्हिसेरा तब्बल आठ महिने उशिरा रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्याची गंभीर बाब उघड झाल्यानंतर पोलिस अधिक्षक विभागात हालचाली सुरू झाल्या आहेत.खुण झाल्यापासून आत्तापर्यंत शिक्रापूर पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर संशयाची छाया निर्माण झाली आहे.

या प्रकरणात संबंधित तपासी अधिकारी, तसेच पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी व्हावी, अशी मागणी आता स्थानिक जनप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी पोलिस अधिकाऱ्यांकडून होत आहे. काहींनी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे थेट निवेदनही दिले आहे.

या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अजूनही कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘सामान्य नागरिकांच्या प्रकरणात पोलिस अधिक्षक तत्काळ कारवाई करतात, मग इतक्या गंभीर खुनप्रकरणात अजूनही कोणतीच कारवाई का झाली नाही?’ असा सवाल आता शिरूर तालुक्यातील नागरिक विचारत आहेत.

पोलीस खात्यातील माजी अधिकारी सांगतात की, कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या तपासात जर पुरावे लपवले गेले किंवा उशिरा दिले गेले, तर ती गंभीर त्रुटी समजली जाते. अशावेळी संबंधितांवर केवळ विभागीय चौकशीच नव्हे, तर भारतीय दंड विधानाच्या कलमानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.

पोलिस अधिक्षक हे कर्तव्यदक्ष, नॉन करप्टेड आधिकारी म्हणुण त्यांचा बोलबाला आहे. अनेक चुकीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांनी चांगला धडा शिकवला आहे .परंतु शिक्रापूर येथील या बहुचर्चित खुणप्रकरणी दोषी आधिकाऱ्यांवर अद्याप कोणतेही कार्यवाही न केल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप झाल्याचीही कुजबूज आहे. तपासात होणाऱ्या अडथळ्यांमुळे खरे दोषी मोकळा सुटण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

2 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

2 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

2 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

4 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

21 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago