आरोग्य

टाचांवरील डेड स्किन ‘या’ छोट्याशा मशीनने काढा चुटकीसरशी

बहुतेकदा आपल्या पायांच्या टाचांची त्वचा अनेकदा कोरडी पडते आणि यामुळेच टाचांना भेगा पडतात. काही लोकांच्या टाचा इतक्या खराब होतात की त्यातून रक्त येऊ लागतं ज्यामुळे चालणं फिरणं कठीण होतं. त्वचेचा कोरडेपणा खूप वाढल्याने त्वचेशी संबंधित समस्या खूप त्रासदायक ठरतात. अनेकदा आपण हातापायांच्या त्वचेची विशेष काळजी घेतो, परंतु पायांकडे मात्र दुर्लक्ष करतो. विशेषत: पायांच्या टाचा आणि तळव्यांवर डेड स्किन साचल्याने अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत जर वेळीच ही टाचांवरची डेड स्किन काढली नाही तर या डेड स्किनचा थर साचून टाचा पांढऱ्या फटक पडतात
डेड स्किनचा थर साचल्यामुळे, पायांचे तळवे आणि टाचांची त्वचा फारच कडक होते. ही कडक झालेली त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे गरजेचे असते. अशावेळी आपण ही टाचांवरची डेड स्किन काढून पाय स्वच्छ आणि सॉफ्ट करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करतो. खरंतर, टाचांवर जमा झालेल्या डेड स्किनचा थर आता घरी सहजपणे काढला जाऊ शकतो.
डेड स्किन काढण्यासाठी डेड स्किन रिमूव्हल मशीनचा वापर कसा करावा
पायांच्या टाचांवर साचलेल्या डेड स्किनचा पांढरा थर काढण्यासाठी आपण या डेड स्किन रिमूव्हल मशीनचा वापर करु शकतो. ही एक डेड स्किन रिमूव्हल मशीन आहे. ही सहज हातात पकडता येईल अशी छोटीशी मशीन आहे. या मशीनवर डेड स्किन काढण्यासाठीचा प्यूमिक स्टोन अटॅचड असतो, ज्याच्या मदतीने आपण टाचांवरील डेड स्किन अगदी सहज काढू शकतो. आपल्याला फक्त ही मशीन ऑन करुन टाचांवरच्या डेड स्किनवर फिरवायची आहे, आणि मिनिटभरात टाचांवरची डेड स्किन निघून जाऊन तुमच्या टाचा मऊ – मुलायम होतील.
डेड स्किन रिमूव्हल मशीनची वैशिष्ट्ये
१) डेड स्किन रिमूव्हल मशीन चार्जेबल आहे त्यामुळे आपण अगदी सहजपणे सी – टाईप चार्जरने ही मशीन चार्ज करु शकतो.
२) आपल्या गरजेनुसार आपण या मशीनचा स्पीड हवा तसा सेट करु शकता.
३) त्वचेच्या प्रत्येक प्रकाराला सूट होईल असे ३ प्रकारचे हेड यात मिळतात. (सॉफ्ट, मिडीयम आणि हार्ड) अशा पद्धतीने आपण त्वचेचा पोत ओळखून मग या हेड्सचा वापर करु शकतो.
४) ही मशीन सतत वापरून ओव्हर हीटिंग झाल्यावर आपोआप बंद होते.
५) आपण ही मशीन अगदी सहजपणे पाण्याच्या वापराने स्वच्छ करु शकतो.
किंमत आणि रेटिंग
हे ‘डेड स्किन रिमूव्हल मशीन’ आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या ‘डेड स्किन रिमूव्हल मशीन’ ला ४.० इतके रेटिंग देण्यांत आले. हे ‘डेड स्किन रिमूव्हल मशीन’ आपल्याला फक्त ९९९ रुपयांपर्यंत सहज विकत मिळते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

8 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago