आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली संधी मिळेल. कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेणार असाल कर टाळा. सध्या वेळी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबात संतुलन राखण्याची गरज आहे. वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. ज्यामुळे वेळ चांगला घालवाल. जुन्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. सरकारकडून सन्मान होईल..

वृषभ: आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त असाल. त्यामुळे घाई करावी लागेल. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात काही प्रलंबित कामे असतील ती पूर्ण होतील. गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ अनुकूल राहिल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्यामध्ये तुम्हाला आईचे सहकार्य मिळेल..

मिथुन: व्यवसायात कोणताही करार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ज्याचा फायदा होईल. वडीलधाऱ्यांच्या मदतीने रखडलेले कामही प्रगतीकडे जाईल. कौटुंबिक मालमत्तेचा विकास होईल. नवीन प्रकल्प सुरु करण्याची संधी मिळेल. शारीरिक आजाराने ग्रासलेले असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. राजकीय लोकांच्या चाहत्यांची संख्या वाढेल. सामाजिक कार्यात अडथळे येतील. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. संध्याकाळी गाणी-संगीताची आवड निर्माण होईल.

कर्क: वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. कामाचे फळ मिळेल. तुम्हाला प्रेम आणि आपुलकी मिळण्याची दाट शक्यता आहे. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. भाऊ आणि बहिणींच्या मदतीने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील. तुमच्या मान-सन्मानासाठी पैसा खर्च कराल. ज्यामुळे शत्रू नाराज होतील. मुलांच्या भविष्याचा विचार कराल.

सिंह: आज डोळ्यांच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील. भविष्यात याचा त्रास अधिक होऊ शकतो. कर्ज घ्यायचे असेल तर ते टाळावे लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबात तणाव पूर्वक वातावरण तयार होईल. शारीरिक त्रासात सुधारणा होण्यास सुरुवात होईल. अनैतिक कामापासून दूर राहा. पालकांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आराम मिळेल.

कन्या: आज तुमच्या सासरच्या लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. गोड शब्द वापरल्यास सर्व ठिक होईल. तुमच्या नात्यात दूरावा येऊ शकतो. मित्रांमुळे खर्च होण्याची शक्यता आहे. लोकांबद्दल चांगला विचार केला तरी स्वार्थी समजतील. आई- वडिलांचे सहकार्य मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. मन प्रसन्न होईल. आज धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदात वाढ होईल.

तुळ: आज कामाच्या ठिकाणी तुमचा अधिकार आणि पद वाढेल. कौटुंबिक मालमत्तेतही वाढ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. नवीन कामात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध प्रस्थापित होतील. वरिष्ठाचे सहकार्य लाभेल. तुमची कामे हळुहळु मार्गी लागतील.

वृश्चिक: व्यवसायाच्या वाढीत प्रयत्नांमध्ये अडथळे येतील. तुमचे मन अस्वस्थ होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाशी संबंधित कामासाठी धावपळ करावी लागेल. संयम आणि कौशल्याने सर्व समस्या हळूहळू संपतील. शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. लव्ह लाईफची काळजी घ्या. तुमच्या शब्दांचा योग्य वापर करा. रागामुळे नात्यात दूरावा येईल. कुटुंबात अशांततेचे वातावरण निर्माण होईल.

धनु: व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. भविष्यात तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. कोणताही वाद प्रलंबित असेल तर त्यात यश मिळेल. व्यवसायाचा विस्तार होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमची बुद्धिमत्ता, शिक्षण आणि ज्ञानात भर पडेल. तुमच्यात परोपकाराची भावना निर्माण होईल. धार्मिक कार्यात रस घ्याल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

मकर: कुटुंबात अनावश्यक खर्च होतील. इच्छा नसताना काम करावे लागेल. ज्यामुळे आर्थिक स्थिती खराब होईल. गुंतवणुकीची योजना आखत असाल तर भविष्यात फायदा होईल. कर्जमुक्तीसाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. कामानिमित्त फिरायला जाल. कठोर परिश्रमानंतर तुम्हाला यश मिळेल ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल.

कुंभ: आज खूप दिवसांनी यश मिळेल. गरजेनुसार पैसे खर्च करा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या यशाने लोक दुखावतील. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी एकाग्रतेने तयारी करावी लागेल. नातेवाईकांच्या घरी जावे लागू शकते. आई-वडिल आणि मुलांमधील संबंध सुधारतील. जोडीदारासोबत वाद होतील.

मीन: कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी वडिलांचे मार्गदर्शन मिळेल. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. प्रेम जीवनात संवाद साधण्याचे प्रयत्न अयशस्वी होतील. सामाजिक सन्मानामुळे तुमचे मनोबल वाढेल. भविष्य उज्जवल करण्यासाठी नियोजित कामे वेळेवर पूर्ण करा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण बनू शकते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

6 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

11 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

12 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

12 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

12 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago