आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. पैसे कमविण्याचे अनेक मार्ग तुमच्या समोर येतील त्याचा लाभ घ्या. आर्थिक स्थिती आज ठिक आहे. आध्यात्मिक कार्यात रुची घेणार आहात. तुमचा द्वेष किंवा मत्सर करणाऱ्यांपासून तुम्ही सावध राहा. आज उधारी करु नका, पैसे परत मिळणार नाही. गुंतवणुकिचा विचार करु शकता

वृषभ: आज व्यवसायाबाबत विचार कराल. एखाद्या कामात गुंतवणूक करताना संकोच करु नका. कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. नात्यात दूरावा येऊ शकतो. आवडत्या वस्तू खरेदी कराल. वरिष्ठांसोबत असणारी तुमची ओळख त्याचा फायदा तुम्हाला होईल. आयात-निर्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे.

मिथुन: आजचा दिवस चांगला आहे. सामाजिक आणि धार्मिक कामात तुम्ही जे योगदान दिले आहे त्याबद्दल तुमचा सन्मान होईल. खरेदी-विक्रिच्या व्यवसायात लाभ असून दिवसभरात चांगल्या बातम्या मिळतील. सासरकडून मदत मिळणार आहे. कार्यक्षेत्रात वातावरण चांगले असेल.

कर्क: आजचा दिवस ठिक असून तुम्हाला नवीन संपर्कातून लाभ मिळेल. तुमचे रखडलेले पेमेंट मिळाल्यामुळे खूप आनंद होणार आहे. कामांमध्ये हलगर्जीपणा करू नका. व्यावसायिक उन्नतीमुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होई. रात्री कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात. प्रियजन भेटल्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल.

सिंह: आज दिवस करिअरमध्ये लाभ असून आर्थिक स्थिती मजबुत होईल. नोकरी तसेच व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या संपत्ती, सन्मान आणि कीर्ती वाढणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रत्येक कामात नशिबाची साथ आहे. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण हवे अन्यथा विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

कन्या: आजचा दिवस उत्तम असून जे लोक शिक्षण क्षेत्रात काम करतात त्यांना विशेष यश मिळेल. स्पर्धेत तुमचा विजय होणार आहे. तुमच्यासाठी नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील तसेच मान- सन्मानात वाढ होईल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावीत होणार आहेत. खूप धावपळ आणि हवामानातील बदल यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, सावध राहा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल..

तुळ: आजचा दिवस यशाने भरलेला असून प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल. वृद्धांची सेवा आणि पुण्य कार्यावर खर्च करणार असून त्यातून समाधान मिळेल. महत्वाची कामे कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखी असेल. प्रगतीचे योग आहेत तसेच व्यवसायात उत्तम नफा आहे.

वृश्चिक: आजचा दिवस शुभ असून प्रत्येक कार्यात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहील. मुलांची प्रगती पाहून समाधान मिळेल. काही रखडलेली कार्य पूर्ण होतील. पचनाचे विकार होवू शकतात, तब्येत सांभाळा. आहारावर नियंत्रण ठेवा.प्रत्येक कामात कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांसोबत वेळ घालवून आनंद मिळेल.

धनु: आजचा दिवस फायद्याचा असून धन प्राप्तीचे योग आहेत. . तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे तसेच व्यवसायातील योजना यशस्वी होतील. तुमच्या कुटुंबातील प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. काही निर्णय घाईघाईत आणि भावनिक होवून घेवू नका त्यामुळे भविष्यात पश्चाताप होऊ शकतो. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात.

मकर: आजचा दिवस शुभ असून प्रत्येक कामात आई-वडिलांता आशिर्वाद मिळणार आहे. ज्येष्ठ व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद होईल. तुम्ही आज खूप व्यस्त राहणार आहात तसेच कामात फोकस ठेवा. गाडी चालवताना सावध राहा. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल.

कुंभ: आजचा दिवस लोकांचा दिवस यशाने भरलेला असून कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणार आहात. दुपारी शुभ समाचार मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. असे काम करु नका ज्यामुळे आजारी पडाल. जंक फूड खाणे बंद करा. रात्री मंगलकार्यात सहभागी होणार आहात. घरी पाहुणे येण्याची शक्यता असून खर्च वाढेल.

मीन: आजचा दिवस यशाने भरलेला आहे पण, ऑफिसमध्ये तुमच्या कामामुळे काही लोकांचा मूड खराब होऊ शकतो. तुमच्यामुळे काही लोकांची चिडचिड होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात हातभार लावणार असून, इतरांना मदत केल्यामुळे आनंद मिळेल. पत्नीची तब्येत खराब होण्यामुळे घरातील वातावरण ताणतणावपूर्ण होऊ शकते. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

2 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

2 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

6 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

21 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

21 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

21 तास ago