आरोग्य

पायांच्या नसा काळ्या-निळ्या पडल्या, फुगल्या? वाचा काय आहे ‘हा’ आजार आणि कारणं…

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, काही लोकांच्या पायांच्या नसांचा रंग निळा होतो आणि नसा खूप जास्त फुगलेल्या असतात. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण यातील एक मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ उभं राहणं किंवा जास्त वेळ बसून राहणं. काही कालावधीनंतर पायांच्या नसा जास्त फुगतात आणि त्यांचा रंगही बदलतो. या समस्येला व्हेरीकोज व्हेन्स असं म्हणतात. अशात तुम्ही सुद्धा जास्त वेळ उभे राहत असाल किंवा जास्त वेळ बसून राहत असाल तर ही समस्या काय आहे याबाबत तुम्हाला माहीत असलं पाहिजे.

व्हेरीकोज व्हेन्स काय आहे

व्हेरीकोज व्हेन्सची समस्या झाल्यावर रक्त पुन्हा हृदयाकडे परत जाण्याऐवजी एकाच जागी जमा होऊ लागतं. ज्यामुळे एकाच भागावर जास्त दबाव वाढतो आणि नसा फुगून जाड होऊ लागतात.

व्हेरीकोज व्हेन्स लक्षण

जास्त वेळ उभं राहिल्यानं पायांमध्ये वेदना होतात आणि जड वाटू लागतात, टाचा आणि पायांच्या खालच्या भागात सूज येते, पायांमध्ये वेदना होतात, प्रभावित नसांच्या आजूबाजूला कोरडेणा किंवा खाज येते, टाचांजवळची त्वचे कोरडी होते आणि जमखा लवकर न भरणे ही लक्षण पुन्हा पुन्हा दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

कुणाला जास्त धोका

व्हेरीकोज व्हेन्सची समस्या वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकते. यात वाढतं वय, आनुवांशिकता किंवा हार्मोन्समध्ये बदल या गोष्टींचा समावेश आहे. त्याशिवाय लाइफस्टाईलची भूमिका देखील असते. ज्या लोकांना एकाच जागी बसून जास्त वेळ काम करावं लागतं, ज्यांना उभं राहून काम करावं लागतं, ज्या महिला अनेकदा प्रेग्नेंट राहतात, ज्यांचं वजन जास्त असतं अशांना ही समस्या अधिक होते.

जर वेळीच या समस्येवर उपाय केला गेला नाही तर समस्या अधिक जास्त वाढू शकते. जसे की, नसांमध्ये क्रोनिक समस्या होते, ज्यामुळे रक्त पुरवठा योग्यपणे होत नाही, त्वचेवर अल्सर, नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होणे, सूज येणे अशा समस्या वाढतात.

काय आहेत उपचार

जर समस्या हलकी असेल किंवा सुरूवातीच्या टप्प्यात असेल तर पायी चालून, पायांचे व्यायाम करून लक्षणं कमी केली जाऊ शकतात. पण जर या गोष्टी करून आराम मिळत नसेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. ही समस्या दूर करण्यासाठी प्रभावी उपचार आहेत. ज्यात व्हेरीकोज व्हेन्सचा ग्लू एब्लेशन किंवा लेजर ट्रीटमेंट, तसेच रेडियोफ्रीक्वेंसी एब्लेशन, स्क्लेरोथेरपी किंवा गंभीर स्थितीत डॅमेज झालेल्या नसा सर्जरी करून काढून टाकणे यांचा समावेश आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

3 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago