आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र असेल. तुमच्या प्रत्येक कामात आज तुम्हाला यश मिळेल. त्याचबरोबर आज अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खूप धावपळ होणार आहे. आज कठोर मेहनत करावी लागेल तर यश मिळेल. तुम्ही नेहमी दुसऱ्यांसाठी जगात कधीतरी स्वतःसाठी जगा तसेच स्वतःला वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक काम नीट विचार करून करा.

वृषभ: आजचा दिवस खूप शुभ आहे. तुम्ही विचार केलेली सगळी कामे आज पूर्ण होणार आहेत. तसेच प्रत्येक काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात आज तुमचे सहकारी पुढे जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यासाठी ते चुकीचा मार्ग निवडणार आहेत, दरम्यान तुम्ही मेहनतीने पुढे जा तुम्हाला उत्तम यश मिळेल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवणार आहात.

मिथुन: आजचा दिवस उत्तम आहे. खूप दिवसांपासून थांबलेली तुमची कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तुमच्या मनावरील ओझे कमी होईल. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळणार आहे. मुलांची करिअरमधील प्रगती पाहून तुमचे मन भरुन येईल. आज तुम्हाला काम करताना अती उत्साह जाणवेल. तुम्ही मेहनतीने काम करा, नशिब तुमच्यासोबत असेल. कुटुंबात वातावरण आनंदी असेल. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळणार आहे त्यामुळे तुमच्या आत्मविश्वास द्विगुणीत होईल..

कर्क: आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही एखाद्या कामासंदर्भात घेतलेला निर्णय तुम्हाला शुभलाभ देणार आहे. तुम्ही आज खूप मोठी कामे करणार आहात. मुलांच्या विवाहात येणारे अडथळे थांबतील. आज लोकांच्या ओळखी होतील त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. आज कोणतरी तुमच्या कामात अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे तेव्हा आज सावध आणि सतर्क राहा.

सिंह: आजचा दिवस सामान्य असून तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्याविरुद्ध कट शिजत आहे. तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय पण तुम्ही सावध राहून काम केलं तर यश तुम्हालाच मिळेल.आज घरासाठी काही वस्तूंची खरेदी करणार आहात. नातेसंबंधाच्या बाबतीत काही कटूता निर्माण झाली असेल तर आज ती कमी होईल. नवीन ओळखीचे रुपांतर मैत्रीत होईल,

कन्या: आजचा दिवस करिअरच्या बाबतीत उत्तम आहे. प्रत्येत कामात नशिबाची साथ मिळणार असून तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. तुम्ही विचार केलेल्या नवीन योजना कार्यान्वीत होणार आहेत. धार्मिक कार्यात खर्च करणार आहात. विरोधक ऑफिसमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करतील. संध्याकाळी पाहुणे येणार आहेत त्यामुळे खर्च वाढेल तसेच तुम्हाला पाहुण्यांना वेळ द्यावा लागेल. कुटुंबात वातावरण ठिक असेल.

तूळ: आजचा दिवस ठीक आहे. तुम्हाला भरपूर काम करावे लागेल पण मेहनतीचे फळ अधिक सुखदायक असते. तुम्ही आज जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. आज एखाद्या कामासाठी तुम्हाला विनाकारण धावपळ करावी लागू शकते. तुमचे गुप्त शत्रू आज जागृत होतील आणि तुम्हाला त्रास देतील, सावध राहा. संध्याकाळी चांगली बातमी मिळेल त्यामुळे मनावरील ताणतणाव कमी होईल..

वृश्चिक: आजचा दिवस ठिक असून तुमचा प्रभाव सगळ्यांवर पडणार आहे. व्यवसायात चांगले संधी आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मेहनत जास्त करावी लागेल. विरोधक आज फार काही करू शकणार नाही. गुंतवणुकिचा विचार करु शकता, यासाठी तज्ज्ञाचा सल्ला उत्तम आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत.

धनु: आजचा दिवस ठिक असून मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नवीन खर्च समोर येऊ शकतात. कोणीतरी तुमच्यावर खोटे आरोप करण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन कराल. समजा आज प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि अपशब्द बोलू नका..

मकर: आजचा दिवस ठिक आहे. तुम्हाला कामे मार्गी लावायची असतील तर व्यवस्थापन आणि फोकस याला महत्त्व द्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क बनतील. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रगती असून समाजात मान सन्मान वाढेल. आज काही नवीन प्रस्ताव येतील पण त्या प्रलोभनांमध्ये फसू नका. सध्या तरी नव्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करणे चांगले आहे.

कुंभ: आजचा दिवस ठिक आहे पण आर्थिक बाबतीत सावध राहा. खर्च जास्त झाल्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. कुटुंबाच्या कामात खूप धावपळ होईल. तुमच्या कार्यकुशलता यामुळे सगळेजण प्रभावित होतील. कामात उत्साह असेल आणि जे काही ठरवलं आहे त्यात यश मिळेल. तब्येतीची काळजी घ्या आणि डॉक्टरांनी काही तपासणी सांगितली तर करून घ्या.

मीन: आजचा दिवस ठीक आहे. कुटुंबात वातावरण मानसिक समाधान देणारे आहे. तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. व्यवसायात लाभाची संधी आहे. नवीन प्रोजेक्ट येतील त्यात फोकस आणि नियोजन हवे. ग्राहक वाढल्यामुळे तुम्हाला उत्पादन वाढवावे लागेल, व्यवस्थापन आणि नियोजनावर भर द्या. संध्याकाळी एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहात..

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

17 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago