आरोग्य

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी घरगुती उपाय

वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सहाजिकच सर्दी, खोकल्याचा, व्हायरल इंफेक्शनचा त्रास बळावतो. सर्दी, पडशाच्या समस्येमध्ये अनेकांना श्वास घेतानाही त्रास होतो. या त्रासामुळे चिडचिड होते. म्हणूनच अशा समस्येवर उपाय म्हणून डॉक्टरांच्या औषधगोळ्यां ऐवजी घरगुती उपायांचा वापर करा. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करुन चोंदलेलं नाक मोकळं करण्यासाठी मदत होऊ शकते.

सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात. या घरगुती उपयांमुळे आपण सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकता.

दूध आणि हळद:- गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.

आल्याचा चहा:- आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताज आल छान बारीक करुन घ्याव आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळाव. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.

लिंबू आणि मध:- लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्याव, खूप फायदा होतो.

लसूण:- लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.

तुळशीची पानं आणि आलं:- तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवन केल्याने लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पान त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

1 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

2 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

2 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

2 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

2 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

16 तास ago