आरोग्य

कसे वाढवाल शरीरातील रक्ताचे प्रमाण

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे असे समजा. अशा वेळेस तुम्हाला कोणत्याही औषोधोपचाराची नाही, तर योग्य आहाराची गरज असते. म्हणूनच अशावेळी कोणता आहार घ्यावा किंवा कोणते घरगुती उपाय करावेत त्याबद्दल जाणून घेऊया.

1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये चमचाभर मध एकत्र करून प्या. यामुळे शरीरातील रक्तवाढ लवकर होते.

2) रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. यामुळे आवश्यक जीवनसत्त्व मिळतात व रक्तवाढ लवकर होते.

3) दररोज सफरचंदाचा एक ग्लास रस प्यायल्यास उत्तम किंवा सफरचंदाच्या रसामध्ये बिटाचा रस आणि मध टाकावा. या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते.

4) तसेच नियमित एक बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

5) थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या रसामध्ये एकत्र करून दररोज पिण्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

6) एक ग्लास टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो सूप पिऊन देखील रक्त वाढ होण्यास मदत होते.

7) रात्रीचे जेवण झाल्यावर शक्य असल्यास शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा. रक्त वाढीसाठी हे फायदेशीर आहे.

8) शरीरातील रक्ताची कमतरता भरण्यासाठी रात्री झोपताना काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दूध प्यावे.

9) टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

10) हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे फायदेशीर आहेण. तुम्ही मका भाजून किंवा उकडून खाऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

9 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

9 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

9 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

9 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

10 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

10 तास ago