आरोग्य

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर वेळीच व्हा सावध; या गंभीर आजाराचा वाढू शकतो मोठा धोका

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये या आजाराने २.४६ लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतं. डोकेदुखी वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय

ब्रेन ट्यूमरमध्ये, मेंदूच्या आजूबाजूच्या पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढतात, ज्यामुळे कॅन्सर होतो. अभ्यासानुसार, मेंदूमध्ये १२० पेक्षा जास्त प्रकारचे ट्यूमर तयार होऊ शकतात. कुटुंबातील कोणाला ब्रेन ट्युमर असेल तर काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय प्लास्टिक आणि केमिकल्स उद्योगात काम करणाऱ्यांनाही सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच विविध पर्यावरणीय परिस्थितींसह जीवनशैली आणि आहारातील अडथळे यामुळेही समस्या वाढू शकतात.

डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष

ब्रेन ट्यूमरमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी, जी सकाळी वाढते किंवा वारंवार जाणवते. असं झाल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

ब्रेन ट्यूमरची लक्षण

डोक्यात वारंवार वेदना होणं

मळमळ आणि उलटीसारखं वाटण

डोळ्यांच्या समस्या, जसं की अंधुक दृष्टी

हात किंवा पायामध्ये वेदना

बोलण्यामध्ये अडचण

स्मरणशक्ती कमी होणं,

अपचणामुळे चक्कर येणं

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago