आरोग्य

गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे

सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही तर ह्याचे बाकीचे अनेक फायदे आहेत. सामान्यतः ८ ते १० ग्लास पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते, पण दिवसातून ३ वेळा गरळ पाण्याची सवय ठेवली तर शरीराच्या आजारापासून आपण वाचू शकतो.

वजन कमी करतं

जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि खूप प्रयत्नांनी सुद्धा काहीच फरक पडत नसेल, तर गरम पाण्यात मध आणि लिंबू मिसळून नियमित ३ महिने प्यावे. जर हे हेल्थी पेय नाही पिऊ शकत तर तुम्ही जेवणानंतर एक कप गरम पाणी प्यायला सुरुवात करा.

सर्दी खोकल्यांपासून सुटका

कोणत्याहि मोसमात छातीत दुखणं आणि खोकला सारखे आजार होत असतील तर गरम पाणी ह्यावर उत्तम उपाय आहे. गरम पाण्यामुळे गळा पण ठीक राहतो. ह्याच्या सेवनाने आराम मिळतो.

पिरियड्स सोपे बनवते

पिरियड्सचे दुखण्यामुळे महिलांना सर्वच कामांमध्ये ब्रेक लागतो. गरम पाणी ह्या दुखण्यावर आराम मिळण्याचे काम करते. ह्या दरम्यान गरम पाण्याने पोटावर सेक करण्याने सुद्धा फायदा होतो.

शरीर डिटॉक्स करते

गरम पाण्याने शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते. आणि हे शरीरातील सर्व अशुद्ध गोष्टी सहज स्वच्छ करते. गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढू लागते, ज्यामुळे घाम येतो आणि ह्याद्वारे शरीरातील सर्व अशुद्धता दूर होतात.

वाढते वय थांबवते

चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या जर चिंता वाढवत असेल तर काळजी करायचे काही कारण नाही. आज पासूनच गरम पाणी प्यायला सुरुवात करा आणि काही आठवड्यातच ह्याचं काम बघा. त्वचेमध्ये तरतरी येऊ लागेल आणि त्वचा चमकदार सुद्धा होईल.

केसांसाठी फायदेशीर

ह्याशिवाय गरम पाण्याचे सेवन केसं आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. ह्यामुळे केसं चमकदार बनतात आणि हे केसांची वाढीसाठी सुद्धा फायदेशीर आहे.

पोटाला ठेवते दुरुस्त

गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली राहते आणि हे ऍसिडिटीच्या समस्यांपासून आराम देते. जेवल्या नंतर एक कप गरम पाणी पिण्याची सवय लावावी. असं करण्याने जेवण लवकर पचतं आणि पोट हलकं ठेवतं.

रक्तप्रवाह सुरळीत ठेवते

शरीराला योग्य पद्धतीने चालण्यासाठी रक्तप्रवाह सुरळीत चालणे आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये गरम पाणी पिणे फायदेशीर आहे.

शरीराची ऊर्जा वाढवते

सॉफ्ट ड्रिंक्स च्या ऐवजी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने शरीराची एनर्जी लेव्हल वाढते आणि डायजेस्टिव्ह सिस्टम पण नीट राहते.

गुडघ्याचे दुखणे दूर करते

गरम पाणी गुडघ्याचे दुखणे कमी करते. आपल्या मांसपेशी मध्ये ८०% भाग पाण्याने बनलेले आहे आणि पाण्यानेच मांसपेशींच्या गाठी दूर होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago