आरोग्य

हाडांमधून येत असेल कट-कट आवाज तर आजपासून खायला लागा हे पदार्थ

धावपळीची लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पौष्टिक अन्नाचा अभाव यामुळे शरीर आतून पोकळ होऊन अनेक तऱ्हेचे गंभीर आजार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर यामुळे आपल्या शरीरातील हाडंही कमकुवत होतात. याच कारणामुळे आजकाल कमी वयातच काही लोकं हाडांशी संबधित समस्येमुळे त्रासलेले असतात.

नाचणी

100 ग्रॅम नाचणीमध्ये 345 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे आहारात नाचणीचा समावेश केल्यास शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळते. त्यासाठी तुम्ही नाचणीच्या पिठाची भाकरी, डोसा किंवा लाडू करून खाऊ शकता.

बीन्स

हाडं पोकळ होऊ नयेत यासाठी प्रथिने, फायबर, कॅल्शियमने भरपूर अशा बीन्सचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. बीन्स हे सुपरफूडमध्ये गणले जाते आणि ज्यांच्या पायातून कट-कट असा आवाज येतो, त्यांनी तर बीन्स लगेचच खाणे सुरू करावे.

सोयाबीन

आपली हाडं मजबूत करण्यासाठी सोयाबीनचा आहारात समावेश करावा, याशिवाय तुम्ही टोफूचाही वापर करू शकता. 100 ग्रॅम टोफूमध्ये 350 मिलीग्राम कॅल्शियम असते. तुम्ही सॅलडमध्ये टोफूचा समावेश करू शकता.

ड्रायफ्रुट्स

हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात मूठभर सुक्या मेव्याचा समावेश केल्यासही नक्कीच फायदा होईल. त्यातही बदाम आणि अक्रोड खाणे आवश्यक आहे. बदाम भिजवून दुधासोबत खाल्ल्याने अधिक फायदे होतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात.

दुग्धजन्य पदार्थ

तसेच आपण आहारात दुग्धजन्य पदार्थांचा अवश्य समावेश केला पाहिजे. रोजच्या रोज दूध पिणे, दही आणि पनीर यांचे सेवन करणे हे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे हाडं तर मजबूत होतातचं पण आपलं शरीरही निरोगी राहत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago