आरोग्य

साबण, शाम्पू लावून रोज आंघोळ करत असालच, एकदा हर्ब बाथ करून बघा; मिळतील एकापेक्षा एक फायदे…

घरातील कामं, बाहेरची कामं, लेकरांचा सांभाळ, वेगवेगळ्या गोष्टींच्या ईएमआय, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यामुळे भरपूर लोक सतत चिंतेत असतात. त्यामुळे त्यांना नेहमीच मानसिक थकव्यासोबतच शारीरिक थकवाही जाणवतो. यातच अंगदुखी, थकवा, मूड नसणे, निराशा अशाही समस्या होतात. आता हा थकवा घालवण्यासाठी किंवा अंगदुखी दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत. यातील एक नॅचरल उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय करायला सोपा आणि खूप फायदेशीर ठरतो.

सगळेच लोक रोज आंघोळ करतात. शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठी रोज आंघोळ करणं गरजेचं असतं. कुणी सकाळी आंघोळ करतं तर कुणी सायंकाळी. सामान्यपणे आंघोळीसाठी गरम किंवा थंड पाणी वापरलं. साबण, शाम्पूचा वापर केला जातो. पण जर अंगदुखी, थकवा दूर करायचा असेल तर थोडी वेगळ्या पद्धतीनं आंघोळ करावी लागेल. ती कशी हे जाणून घेऊ.

आंघोळ तुम्ही रोज करता तशी न करता वेगळ्या पद्धतीनं जर केली तर अंगदुखी, कणकण, आणि थकवा दूर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त आंघोळीच्या पाण्यात काही हर्बल टाकावे लागतील.

कशी करावी आंघोळ?

हर्ब बाथ करण्यासाठी तुम्ही कोणतेही हर्बल निवडू शकता. जसे की, लॅवेंडर, पेपरमिंट, रोजमेरी आणि ओवा. जर तुमच्याकडे या गोष्टी लिक्विड स्वरूपात असतील तर २५ ते ३० मिली लीटर घ्या. पण जर हे हर्ब तुमच्याकडे ड्राय स्वरूपात असतील तर तुम्ही बकेटीत ३ ते ४ चमचे टाकू शकता.

जर तुमच्याकडे ड्राय हर्ब असतील तर तुम्ही एक लीटर पाण्यात ते टाका. हे पाणी उलडू द्या आणि नंतर २० मिनिटे तसंच राहू द्या. आता हे पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात मिश्रित करा. हे लक्षात ठेवा की, जेव्हाही तुम्ही थकलेले असाल तेव्हा पाणी फार जास्त गरम घेऊ नका. आंघोळीचं पाणी कोमटच असावं. कारण याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढवण्यास आणि नर्ब्सना रिलॅक्स करण्याचं काम करतं.

दुसरा उपाय

एक लिटर पाणी घ्या आणि त्याला उकडी येऊ द्या. या पाण्यात लॅवेंडर किंवा लेमन एसेंशिअल ऑइल मिश्रित करा. सोबतच ५ चमचे गुलाबजल मिश्रित करा. आता हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिश्रित करा. याने आंघोळ केल्यावर तुमचे मसल्स रिलॅक्स होतील आणि अंगदुखीही दूर होईल. हे उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

तिसरा उपाय

आंघोळीच्या पाण्यात थोडं सैंधव मीठ घातल्यास याने त्वचेचं ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि त्वचा आतून ग्लो व्हायला लागते. एक बकेट पाण्यात एक चमचा सैंधव मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ करा. तसेच जास्तीत जास्त लोक हे मीठ केवळ खाण्यातच वापरतात, अशात मीठ जर पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील.

यात आढळणाऱ्या मॅग्नेशिअम, सोडियम आणि कॅल्शिअमसारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वांमुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं. तसेच रोज या आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास याने केसांमध्ये डॅड्रफही होणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

14 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

15 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

16 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

16 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

16 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

16 तास ago