आरोग्य

आपला चेहरा सकाळी उठल्यावर ड्राय दिसत असेल तर…

अनेक कंपन्यांच्या क्रीम आणि लोशन वापरून झाले असल्यावरही चेहर्‍यावर ती चमक येत नाहीये का? तर आम्ही आज आपल्या घरगुती नाइट फेस मास्कबद्दल माहिती देत आहोत ज्याने आपली त्वचा चमकदार होण्यात मदत मिळेल.

हळद आणि बेसन:- चार चमचे बेसन आणि दोन चमचे दूध किंवा सायीत चिमूटभर हळद मिसळून मास्क तयार करा. हा रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. सकाळी गार पाण्याने धुऊन घ्या.

स्ट्रॉबेरी:- व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिडने भरपूर स्ट्रॉबेरी त्वचेला निरोगी बनवतं. हे मास्क तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरी दुधासोबत क्रश करून पेस्ट तयार करा. त्यात एक चमचा बेसन मिसळून चेहर्‍यावर लावा. सकाळी गार पाण्याने धुऊन घ्या. चेहरा चमकदार दिसेल.

ओट्स आणि दही:- ओट्स बारीक वाटून त्या एक चमचा दही, एक चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. सकाळी उठल्यावर धुऊन घ्या.

चंदन:- ड्राय, ऑयली आणि पिंपल असलेल्या ‍त्वचेसाठी चंदनाचे मास्क उत्तम आहे. हे लावल्याने खाज दूर होते आणि त्वचा निरोगी राहते. हे मास्क तयार करण्यासाठी चंदन पावडरमध्ये जरा दूध, लॅवेंडर ऑयल आणि दोन चमचे बेसन मिसळा. किंवा आपण फक्त चंदन पावडर ही वापरू शकता. नंतर गार पाण्याने धुऊन टाका. चेहरा ग्लो करेल.

झेंडू:- झेंडूच्या फुलात अॅटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टिरिअल गुण असतात. झेंडूचे पाने दुधात भिजवून ठेवा. यात एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा. सकाळी पाण्याने स्वच्छ करा.

गुलाब:- गुलाबाच्या झाडांची पाने उन्हात वाळवून घ्या नंतर याची पावडर तयार करा. यात दूध, साय मिसळून आवश्यकतेनुसार ग्लिसरीन मिसळा. हा मास्क रात्रभर लावून ठेवा.

लिंबू आणि मध:- दोन चमचे मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावा. रात्रभर चेहर्‍यावर राहून द्या. सकाळी उठून धुऊन घ्या. त्वचा चमकेल.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

5 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

5 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

21 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago