महाराष्ट्र

छटपूजा भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक

प्रत्येक समाजाच्या सण-उत्सवात सहभागी होणे हीच महाराष्ट्राची परंपरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: छटपूजा हा केवळ धार्मिक विधी नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. उगवत्या आणि मावळत्या सूर्याची पूजा करणारा हा अनोखा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देतो. आपली संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सव पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. राज्यातील प्रत्येक समाजाच्या सण-उत्सवांमध्ये सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाण्यातील रायलादेवी तलाव परिसरात आयोजित छटपूजा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छटमातेचे आशीर्वाद सर्व नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाभावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव तथा ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे, मनोज शिंदे, एकनाथ भोईर, योगेश जानकर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणून २०२२ मध्ये जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोविड काळातील निर्बंध हळूहळू हटवून सर्व सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना मोकळीक देण्याचा निर्णय घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली. गोपाळकाला, दहीहंडी, नवरात्रोत्सव यांसह सर्व सण उत्साहात साजरे व्हावेत, ही सरकारची भूमिका राहिली आहे. छटपूजेसारख्या परंपरांनाही सरकारकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, असे ते म्हणाले.

संकटाच्या काळात राजकारण नको, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा!

राज्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या सोबत असून, समाजातील प्रत्येक घटकानेही मदतीसाठी पुढे यावे. संकटाच्या काळात राजकारण न करता माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

छटपूजेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व आयोजक, कार्यकर्ते आणि नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले. छटमातेचे आशीर्वाद सर्वांना लाभोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान व समृद्धी नांदो, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

थंडीत न चुकता या ४ अवयवांना करा तुपानं मालिश

साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अ‍ॅसिड,अ, के…

3 मिनिटे ago

काही आयुर्वेदिक शॉर्ट टिप्स

1) सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या हे पाचनासाठी चांगले असते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर…

7 मिनिटे ago

मंत्रालयात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई: आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी संघर्ष करणारे आणि देशाच्या…

2 तास ago

११ वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंगला मिळणार नवसंजीवनी

अमित शाहांच्या उपस्थितीत १,५०० कोटींच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन पुणे : तब्बल ११ वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल…

2 तास ago

चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाचा आजपासून जल्लोष!

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील कलात्मकता, आशय-विषयांची विविधता आणि नव्या चित्रपट प्रवाहांचा उत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत…

5 तास ago

घोड धरणातील वाळूमाफियांचे इंस्टाग्राम स्टेटसद्वारे प्रशासनाला खुले आव्हान; पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह शिरूरच्या यंत्रणेचे नेमके चाललेय तरी काय?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपशाचा…

1 दिवस ago