आरोग्य

हातापायांवर दिसतात किडनी डॅमेजची ‘ही’ लक्षण याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळ

किडनी आपल्या शरीरात फिल्टरचं काम करतात. किडनी रक्त फिल्टर करून त्यातील विषारी तत्व आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतात. पण जेव्हा किडनींमध्ये काही बिघाड होतो, तेव्हा त्या योग्य पद्धतीने काम करत नाहीत. याचा प्रभाव आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. किडनीमध्ये बिघाड जर झालाच तर सगळ्यात आधी याचे संकेत आपले हात आणि पायांवर दिसतात. पण अनेकदा लोक या संकेतांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. अशात आज आपण हात आणि पायांवर दिसणारे संकेत बघणार आहोत.

किडनीची शरीरातील कामं

किडनींचं काम केवळ शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणं नाही. तर शरीरात पाणी, मीठ आणि मिनरल्स जसे की, पोटॅशिअम-कॅल्शिअममध्ये संतुलन ठेवणं हेही असतं. इतकंच नाही तर ब्लड प्रेशर कंट्रोल करणारे आणि रक्त बनवण्यात मदत करणारे हार्मोन्स देखील किडनीद्वारे तयार केले जातात. त्यामुळे जर किडनीमध्ये काहीही बिघाड झाला तर पूर्ण शरीर प्रभावित होतं.

हात – पायांवर सूज

हात, पाय आणि टाचांवरील सूज हा किडनीमध्ये काहीतरी गडबड असल्याचा मोठा संकेत असतो. जर सूज आलेल्या जागेवर बोटाने दाब दिला आणि तेथील त्वचा आत गेली आणि हळूहळू वर आली तर समजून घ्या की, शरीरात पाणी जमा होत आहे. हा किडनी कमजोर झाल्याचा स्पष्ट इशारा आहे.

स्नायूंमध्ये सतत वेदना

किडनी डॅमेज झाल्यावर स्नायूंमध्ये तणाव आणि अचानक आखडलेपणा जाणून शकतो. असं होण्यामागचं कारण म्हणझे किडनी इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडवतात. पायांच्या स्नायूंमध्ये वेदना आणि आखडलेपणा या समस्येचे सुरूवातीचे संकेत असू शकतात.

त्वचेवर खाज – कोरडेपणा

जर हात किंवा त्वचेवर जास्त खाज, कोरडेपणा किंवा रॅशेज दिसत असतील, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करूी नका. या गोष्टी तेव्हाच होतात, जेव्हा किडनी रक्तातून विषारी तत्व बाहेर काढू शकत नाहीत. हे विषारी तत्व त्वचेत जमा होतात, ज्यामुळे खाज आणि जळजळ होते.

हात – पायांमध्ये झिणझिण्या

हात आणि पायांमध्ये झिणझिण्या किंवा सुन्नपणा देखील किडनीमध्ये बिघाडाचे संकेत असू शकतात. किडनी डॅमेज झाल्याने नसांवर प्रभाव पडतो. ज्याला मेडिकल भाषेत पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणतात. यामुळे हात आणि पायांमध्ये वेगळीच जाणीव होते.

सतत थकवा – कमजोरी

पायांमध्ये सतत वेदना, कमजोरी किंवा थकवा सुद्धा किडनीसंबंधी समस्यांकडे इशारा करतो. शरीरात टॉक्सिन जमा झाल्याने हाडं आणि स्नायूवर प्रभाव पडतो. जर यातील कोणतंही लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. किडनीची टेस्ट करा, कारण वेळीच जर निदान झालं तर किडनी पूर्ण डॅमेज होणं टाळता येऊ शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

11 तास ago

कडूलिंबातील औषधी गुण

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…

11 तास ago

औषधांच्या वेळा पाळण्यापेक्षा जेवणाच्या वेळा पाळ्णं हे जास्त फायद्याच

केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी…

11 तास ago

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लावून निवडणुका नकोत! विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…

12 तास ago

शिरूर नगरपरिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांची खुर्ची अविश्वास ठरावाने धोक्यात

२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…

19 तास ago

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत तुफान हाणामारी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…

19 तास ago