आरोग्य

रोज एक्सरसाईज करणं गरजेचं आहे का, आठवड्यातून किती तास पुरेसे ठरतील

लोक आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रोज एक्सरसाईज करण्याकडे भर देतात. इतकंच नाही तर अनेकांना असं वाटतं की, हेल्दी राहण्यासाठी रोज एक्सरसाईज केली पाहिजे किंवा जिममध्ये जायला हव.

तसं पहायला गेलं तर एक्सरसाईज करण्यामागचा उद्देश शरीर अ‍ॅक्टिव ठेवणं आहे. यासाठी सतत जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही इतरही काही गोष्टी करू शकता. जसे की, कधी कधी बिल्डींगच्या पायऱ्या चढणं आणि उतरणं, 30 ते 40 मिनिटं वॉक करणं, काम करत असताना छोटे छोटे ब्रेक घेऊन वॉक किंवा हालचाल करणं या गोष्टीही खूप फायदेशीर ठरतात.

तुम्ही शरीराची जास्त मेहनत करण्यापेक्षा किंवा जास्त स्ट्रेस घेण्याऐवजी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतूनही तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. तुम्ही जर कामात जास्त वेळ बिझी राहत असाल तर या टिप्स नक्कीच तुमच्यासाठी कामात येऊ शकतात. सोबतच तुम्हाला तुम्ही शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळ देऊ शकत नाही, असा गिल्टही येणार नाही.

रोज एक्सरसाईज करणं गरजेचं आहे का

रोज जगणं सगळ्यांचं वेगवेगळं असतं. एखाद्याला कामाला कधी जास्त उशीर लागू शकतो तर एखादं काम लवकर पूर्ण होतं. कधी जास्त कामामुळे थकवा येतो तर कधी एक्सरसाईज करण्याचा मूड नसतो. रोज एक्सरसाईज केलीच पाहिजे असं काही नाही. स्वत:वर दबाव टाकण्याऐवजी शरीराची गरज समजून घेतली पाहिजे. आठवड्यातील दोन ते तीन दिवस एक्सरसाईज करूनही तुम्ही फिट राहू शकता.

छोट्या गोष्टींचा मोठा प्रभाव

नेहमीच जिमला जाण्याची किंवा रोज खूप जास्त एक्सरसाईज करण्याची गरज नसते. रोज तुम्ही पायी चालणे, पायऱ्या चढणं-उतरणं, सतत बसण्याऐवजी उभं राहून काम करणं या गोष्टींमुळेही तुम्ही फिट राहू शकता. या गोष्टी करूनही तुम्ही बॉडी फिट ठेवू शकता आणि कॅलरी बर्न करू शकता.

खाणं-पिणंही तेवढच महत्वाचं

शरीराचं फिटनेस चांगलं ठेवणं यासाठी केवळ एक्सरसाईज ही एकच बाब नाही. एक्सरसाईजसोबतच पौष्टिक आणि संतुलित आहार घेणंही तेवढंच महत्वाचं ठरतं. आहारात फायबर, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन आणि आयर्न यांचा समावेश असला पाहिजे. जंक फूड, शुगर असलेल्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तसेच दिवसभर भरपूर पाणी पिणंही गरजेचं असतं.

आठवड्यातून 150 मिनिटं पुरेसे

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी रोज दोन तास जिममध्ये घाम गाळण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही आठवड्यातून केवळ 150 मिनिटं हलकी शारीरिक हालचाल करूनही फिट राहू शकता. यासाठी तुम्ही पायी चालणं, धावणं, डान्स करणं या गोष्टी करू शकता. ही वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार विभागून घेऊ शकता. जसे की, रोज 30 मिनिटं किंवा आठवड्यातून 5 दिवस. नियमितता महत्वाची आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

7 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

1 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

1 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

1 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago