शिरूर तालुका

म्हणजे वाघाचे पंजे हा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार

शिरूर (अरुणकुमार मोटे): “म्हणजे वाघाचे पंजे” हा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये या उत्सुकता निर्माण झाली आहे. साहस, नाट्य आणि सामाजिक संदेश असलेला हा विनोदी आणि आई मुलीच्या नात्यातील नाजूक बंध असलेला चित्रपट विविध नामांकित कलाकारांनी सजवलेला आहे. हा चित्रपट शिरूर येथील ओम्स आर्ट चे प्रमुख डॉ. संतोष पोटे व डॉ. सुनीता पोटे,कौशिक मेहेता प्रदर्शित करणार आहे. म्हणजे वाघाची पंजे हा चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून यासाठी शिरूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

चित्रपटात सौरभ गोखले, निखिल चव्हाण, तमन्ना बांदेकर, संजय नार्वेकर, दीपाली सय्यद आणि चिन्मय उदगीरकर हे प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. तर या चित्रपटात प्राजक्ता हणमघर, अनिल नागरकर, मेघराज राजेभोसले, घनश्याम दारोडे आणि सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकारही महत्वाच्या भूमिका साकारत आहेत.

या चित्रपटासाठी रॅप साँग, रोमँटिक साँग क्लासिकल साँग चार गाणी असून सर्व त्यातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहे. ओम्सआर्ट प्रदर्शित आणि दिग्दर्शित‘ कोती ‘ हा चित्रपट त्यांच्या विशेष गाजला असून, राज्य शासनाचा पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला आहे. पोस्को हा चित्रपटही प्रदर्शित केला असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

IMDb रँकवरही चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला असून, त्यात प्राजक्ता हणमघर, संजय नार्वेकर, दीपाली सय्यद, सौरभ गोखले, अनिल नागरकर, चिन्मय उदगीरकर, निखिल चव्हाण, घनश्याम दारोडे, सिद्धेश्वर झाडबुके, तमन्ना बांदेकर आणि मेघराज राजेभोसले यांचा समावेश ‘टॉप कास्ट’मध्ये करण्यात आला आहे.

चित्रपटाला हर्षवर्धन वावरे व त्रीनिती यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट राज्यातील तीनशे चित्रपट गृहात ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे ओम्स आर्ट चे प्रमुख डॉ. संतोष पोटे यांनी सांगून,चित्रपटाची कथा, अभिनय आणि सादरीकरण यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरनार असल्याचे विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

हा चित्रपट आई आणि मुलगी यांच्या नाजुक संबंधातील असून, या चित्रपटाला बॉलिवूड टच देण्यात आला असून, मराठी चित्रपट सृष्टितच करिअर करायचे ठरवले आणि ते सत्यात उतरले व मराठी चित्रपट सृष्टितील दिग्गज कलाकार यांच्या बरोबर काम करीत असल्याचा आनंद होत आहे.

तमन्ना बांदेकर,अभिनेत्री, म्हणजे वाघाचे पंजे चित्रपट

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

10 मिनिटे ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

17 मिनिटे ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

19 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

23 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

23 तास ago