आरोग्य

उन्हाळ्यात रोज एक कच्चा कांदा खाण्याचे शरीराला होणारे फायदे

कांदा आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. कारण कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी कांद्याचाच अधिक वापर केला जातो. कांदा टेस्टी तर असतोच, सोबतच यात अनेक पोषक तत्वही असतात. बरेच लोक जेवणासोबत कच्चा कांदाही खातात. कच्चा कांदा खाणं उन्हाळ्यात अधिक फायदेशीर मानलं जातं. इतकंच नाही तर बरेच लोक उन्हाळ्यात घराबाहेर पडताना खिशातही एक कांदा ठेवतात. आता उन्हाळ्यात जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यानं काय होत.
कांद्यामध्ये सोडिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट्स यांसारखे पोषक तत्व असतात. अशात जर तुम्ही जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर तुम्हाला अनेक पोषक तत्व यातून मिळू शकतात.
उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
कांदा थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कांदा खाणं फायदेशीर ठरतं. यात पाणी भरपूर असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. सोबतच यात सोडिअम आणि पोटॅशिअम असतं जे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.
खाज आणि घामोळ्यांपासून बचाव
कांद्यामधील क्वेरसेटिन आणि सल्फरमुळे शरीर थंड राहतं. क्वेरसेटिन एक असं तत्व आहे जे हिस्टमाइन नावाचं रसायनही कमी करतं जे उष्णतेमुळे एलर्जी, रॅशेज आणि कीटक चावल्याने होणारी खाज दूर करतं.
ब्लड प्रेशर कंट्रोल
उन्हाळ्यात शरीराला आपलं तापमान सामान्य ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हृदय, फुप्फुसं आणि किडनीवर जास्त दबाव पडतो. कांद्यातील एलील सल्फाइड्स रक्तवाहिन्या लवचिक आणि पसरट ठेवण्यास मदत करतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि रक्त पुरवठाही सुरळीत राहतो.
कांद्याचा रसही फायदेशीर
उन्हाळ्यात शरीरात जर उष्णता वाढली असेल तर अशावेळी उष्णता कमी करण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस रात्री झोपताना तळपायांना लावून ठेवा. यामुळे उष्णता दूर होईल. तसेच कांद्याचा रस तुम्ही कपाळावरही लावू शकता. यानंही उष्णता बाहेर निघते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago