दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ ब्रश करणे, दात स्वच्छ करणेच पुरेसे नाही. त्यासाठी तुम्ही टूथब्रशची काळजी कशी घेता याकडे लक्ष देणेही खूप गरजेचे आहे.
टूथब्रशमधील जीवाणू तोंडाच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात
टूथब्रशवरील हानिकारक सूक्ष्म जंतू तोंडात पुन्हा प्रवेश करू शकतात, ज्यामुळे प्लेक तयार होणे, दात किडणे व हिरड्यांचे आजार होऊ शकतात. काही अभ्यासांतून असे सुचवण्यात आले आहे की, टूथब्रशवरील रोगजनक श्वासाची दुर्गंधी यांसारख्या परिस्थितीत वाढवू शकते किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या हिरड्यांच्या समस्या वाढवू शकते.
हे धोके कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत..
अन्नाचे कण आणि टूथपेस्टचे अवशेष काढून टाकण्यासाठी प्रत्येक वापरानंतर टूथब्रश पूर्णपणे स्वच्छ धुवा.
तो सरळ ठेवा आणि हवेत कोरडा होऊ द्या. जीवाणू ओलसर वातावरणात वाढतात. म्हणून टूथब्रश कोरडा ठेवणे महत्त्वाचे आहे.
टूथब्रशला हवाबंद टोपीने झाकणे टाळा. कारण- त्यामुळे ओलावा वाढतो आणि सूक्ष्म जीवांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
ब्रिस्टल्स प्रभावी आहेत याची खात्री करण्यासाठी आणि जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी दर तीन-चार महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदला.
टूथब्रश स्वच्छतेसाठी उपाय
यूव्ही लाइट सॅनिटायझर्स
ही उपकरणे अतिनील किरण उत्सर्जित करतात, जे त्यांच्या डीएनएमध्ये व्यत्यय आणून जीवाणू आणि विषाणू मारतात. अभ्यास दर्शवितो की, यूव्ही सॅनिटायझर्स टूथब्रशवरील जीवाणूंचा भार ९९% पर्यंत कमी करू शकतात.
जीवाणूविरोधी माउथवॉशमध्ये भिजवणे..
ही पद्धत टूथब्रशच्या ब्रिस्टल्सवर असलेले जीवाणू नष्ट करण्यासाठी प्रभावी आहे. उपलब्ध असलेले हे साधन वापरण्यास सोपे, सहज आणि प्रभावी आहे.
टूथब्रशचे ब्रिस्टल्स काही मिनिटे गरम पाण्यात ठेवल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात; परंतु तसे वारंवार केल्यास ब्रिस्टल्सचे नुकसान होऊ शकते.
डिशवॉशर पद्धत…
काही लोक त्यांचे टूथब्रश डिशवॉशरमध्ये स्वच्छ करण्यासाठी ठेवतात. उष्णता आणि डिटर्जंटमुळे जंतू नष्ट होऊ शकतात; परंतु त्यामुळे टूथब्रशचे आयुष्यही कमी होऊ शकते.
(सोशल मीडियावरून साभार)
सकपाळ यांच्या निरर्थक आणि बिनबुडाच्या आरोपांवर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जोरदार घणाघात मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…
श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…
मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…
धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…