आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ असून तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. घरासाठी वस्तू खरेदी करणार आहात, खास करून गृहोपयोगी वस्तूंमध्ये वाढ होईल. हाताखालील कर्मचारी आणि नातेवाईक यांच्यामुळे काही तणावाची स्थिती उत्पन्न होऊ शकते. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा. सासरच्या बाजूने शुभलाभ आहे. वाहन वापरताना सावधगिरी बाळगा.

वृषभ: रोजगाराच्या क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. धनवृद्धीचे योग असून तुम्हाला राजकीय मदत मिळण्याची शक्यता आहे. तुमची कामे त्यामुळे अधिक वेगाने मार्गी लागतील. तब्येतीच्याबाबतीत सावध राहा आणि कामावर जास्त लक्ष केंद्रित करा. बोलण्यावर संयम ठेवा. विरोधक आज तुमचे काही बिघडवू शकणार नाहीत.

मिथुन: व्यावसायिक प्रतिष्ठा आज वाढेल. तुम्हाला भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. तसेच मानसन्मान वाढेल. एखादे कार्य संपन्न झाल्याने तुमचे वर्चस्व वाढणार आहे. सासरच्या बाजूने मात्र थोडा तणाव असेल. मैत्रीचे संबंध मधुर राहतील. तुमची कामे यशस्वी होणार असून आनंदात वाढ होईल.

कर्क: धनवृद्धी होईल. तुमची बचत वाढणार आहे. वैवाहिक जीवनात सुख द्विगुणीत होणार आहे. धन, पद, प्रतिष्ठा यात वृद्धी होईल. व्यापार आणि करिअरमध्ये काही कारणांमुळे त्रास असेल तसेच समस्यांना तोडं द्यावे लागेल. परीक्षेच्या दिशेने केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. विरोधकांवर मात करणार आहात.

सिंह: रोजगाराच्या दिशेने तुम्हाला यश मिळेल. तुमच्या पराक्रमात वृद्धी होईल तसेच थांबलेली कामे पूर्ण होतील. भेटवस्तू आणि सन्मानाचा योग आहे. इतरांचे सहकार्य मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. प्रवासात शुभ लाभ असून प्रियजनांची भेट होईल. आज मनावरील ताणतणाव कमी होणार आहे. व्यापाराशी संबंधित योजना पूर्ण होतील.

कन्या: काही आवश्यक कामावर खर्च करावा लागेल, तसेच आज तुमची कीर्ती वाढणार आहे. व्यावसायिक बाबतीत उत्तम यश आहे. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. विरोधक पराभूत होतील. नोकरीत प्रगती असून व्यापारात चांगला नफा मिळेल.

तुळ: करिअरमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. राजकीय क्षेत्रात तुळ राशीचे जे लोक काम करत आहेत त्यांना यश मिळेल आणि तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या प्रत्येक कामात सरकारी अधिकारी यांसह सगळ्यांची मदत मिळेल. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. मित्रांची भेट झाल्याने तुमचे मन प्रसन्न होईल. उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल ठेवणे गरजेचे आहे. खर्चाकडे लक्ष द्या कारण अनावश्यक खर्च वाढतो आहे.

वृश्चिक: नशिबाची साथ असेल आणि कौटुंबिक जीवन सुखाचे असणार आहे. तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता दिसते. त्यामुळे सांभाळून राहा आणि प्रत्येक कामात सावध राहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु: आर्थिक विषयात यश मिळण्याचे योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मिळकत उत्तम असेल. तुमच्या वाणीमध्ये गोडवा असू दे म्हणजे तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज जे काही काम कराल त्यात नशिबाची साथ असेल. तब्येतीबद्दल सतर्क राहा. खाण्यापिण्यात काळजी घ्या, जंक फूड खाणे कमी करा. तणावापासून दूर राहा आणि स्वतःच्या कामावर फोकस ठेवा. सासरच्या बाजूने लाभ होणार आहे

मकर: तुमच्या व्यावसायिक योजनांना बळ मिळणार असून धनवृद्धी होईल. तब्येतीबद्दल सतर्क राहा. ऑफिसच्या कामात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. मनोरंजनाची संधी देखील मिळेल. तुमच्या कामाची धडाडी पाहून विरोधक पराभूत होणार आहेत. तुमचे फोकस करिअरवर जास्त ठेवा.

कुंभ: रोजगार मिळवण्याच्या दिशेने सुरू असलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्यासाठी आज भाग्यवृद्धीचा दिवस आहे आणि तुम्हाला व्यापारात यश मिळेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. खाणेपिणे यावर संयम ठेवा. सासरच्या लोकांशी वादविवाद टाळा. वाणीत गोडवा ठेवा. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

मीन: आज मानसन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. रोजगाराच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्न यशस्वी होणार आहेत. तुम्हाला राजकीय सहकार्य मिळेल. पैसे खर्च करताना आज खूपवेळा विचार करण्याची गरज आहे. बोलण्यात संयम ठेवला तर नात्यात गोडवा वाढेल. धनवृद्धी होईल आणि योजना यशस्वी होतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

9 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

9 तास ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

9 तास ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

19 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

19 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

19 तास ago