आरोग्य

तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात, ‘या’ पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत

हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण वयाची पन्नाशी, साठी ओलांडली की मग गुडघे कुरकुरायला सुरुवात व्हायची. पण आता मात्र लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कमी वयातच तरुण मंडळींचे गुडघे दुखायला सुरुवात झाली आहे. जमिनीवर मांडी घालून बसण्याचा, उठण्याचा बहुतांश लोकांना प्रचंड कंटाळा येतो कारण बसता, उठता गुडघे दुखतात हा त्रास टाळण्यासाठी आहारावरही थोडा भर दिला पाहिजे आणि व्यायामाकडेही जरा लक्ष दिलं पाहिजे.

गुडघेदुखी कमी करण्यासाठी व्यायाम

गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी दिवसातून १० ते १५ मिनिटे दररोज नियमितपणे थोडे उलटे चालावे. म्हणजेच पुढे जाण्याच्या ऐवजी मागे जावे. अशा पद्धतीने चालल्यामुळे गुडघ्यांवर योग्य तो दाब येऊन त्यांचा व्यायाम होतो. याशिवाय गुडघ्यांशी जोडलेले असणारे पोटऱ्यांचे स्नायू तसेच मांडीचे स्नायू यांचाही व्यायाम होतो आणि गुडघेदुखीचा त्रास खूप कमी होतो.

उलटे चालल्यामुळे होणारे इतर फायदे

उलट्या पद्धतीने चालल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास तर कमी होतोच, पण त्यासोबतच इतरही काही फायदे होतात.

1) पहिला फायदा म्हणजे पायाच्या घोट्यांचाही योग्य व्यायाम होतो आणि ज्यांचे घोटे दुखतात, तो त्रासही कमी होण्यास मदत होते.

२) मेंदूचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते. आपला मेंदू आणखी ॲक्टीव्ह होतो..

3) दोन्ही पाय तसेच मेंदूमधला समन्वय वाढण्यास आणि त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

४) शरीराचा योग्य तो समतोल साधण्याची आपली क्षमता वाढू लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

2 तास ago