आरोग्य

गुडघे- कंबर दुखीवर बनवा ही हेल्दी रेसिपी

महिलांमध्ये सांधेदुखीच्या वेदना जास्त प्रमाणात असतात. खासकरून वयस्कर लोकांमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास उद्भवतो तुम्हालाही असा त्रास होत असेल तर काही सोप्या गोष्टी फॉलो करून तुम्ही तब्येतीच्या समस्य टाळू शकता. ५ मिनिटांत एक हेल्दी रेसिपी बनवा ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळेल. ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. फक्त ४ हेल्दी वस्तू मिसळून झटपट एक हेल्दी रेसिपी बनवावी लागेल. यामुळे वेदना कमी होतील आणि तुमची तब्येतही चांगली राहील.

आईची तब्येत तुमची जबाबदारी

लहानपणी आपण जेव्हा आजारी असायचो तेव्हा आईला रात्रभर जागावे लागत होते. आपल्याला जराही त्रास झाला तर आई अस्वस्थ व्हायची, आता आईचे वय वाढत चालले आहे. आईची काळजी घेणं मुलांची जबाबदारी आहे, घरातल्या कामांचा आईला थकवा येतो ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी काही सुपरफूड्स खाऊ घालायला हवेत ज्यामुळे वेदनांपासून आराम मिळेल.

मेनोपॉज सुरू होताच महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन हॉर्मोनचा स्तर कमी होऊ लागतो. या कारणामुळे महिलांची हाडं कमकुवत होऊ लागतात आणि सांध्यांचे दुखणं सुरू होते. ज्यामुळे त्यांना थकवा, उदास वाटणं, हताश होणं अशी लक्षणं जाणवतात. याच वयात महिला ऑस्टिओपॅरोसिस या आजाराचे शिकार होतात. यावेळी महिलांची योग्य देखभाल, योग्य आहार, योग्य लाईफस्टाईल आणि फिटनेसकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. हाडांना मजबूत बनवण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार फार महत्वाचा असतो

महिलांनी वयाच्या चाळिशीनंतर ४ सुपरफूड्चा आहारात समावेश करायला हवा. या सुपरफूड्समुळे हाडं कमजोर होत नाहीत आणि महिला सांधेदुखीच्या वेदनांपासून बचाव होतो. ओमेगा ३ फॅटी एसिड्सने परिपूर्ण अक्रोड मेंदूसाठी उत्तम ठरते. ज्यामुळे शरीराची सूज कमी होते महिलांना मूड स्विंग्स होत नाही. फायबर्स, कार्ब्सने परिपूर्ण रताळे खाल्ल्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये येते आणि शरीराची उर्जा वाढते.

दह्यातील प्रोटीन आणि प्रोबायोटिक गट हेल्थ दुरूस्त करते. यामुळे मूड चांगला राहतो आणि शरीराची सूज कमी होतो. डाळिंबात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. यातील इस्ट्रोजन हॉर्मोन लेव्हल कंट्रोल होण्यास मदत होते आणि सांध्याच्यां वेदनांपासून आराम मिळतो ताण-तणाव दूर होण्यासही मदत होते.

सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी सुपरफूड्सची ही रेसिपी ट्राय करा. सगळ्यात आधी एक वाटीत दही घ्या. त्यात उकडलेले रताळ्याचे तुकडे घाला त्यात अक्रोड मिसळा. नंतर डाळिंबाचे दाणे घाला. या रेसिपीला चटपटीत बनवण्यासाठी तुम्ही यात चाट मसाला मिक्स करू शकता. प्रोटीन, हेल्दी फॅट आणि एंटी ऑक्सिडेंट्सची परिपूर्ण ही रेसिपी ट्राय केल्यास हाडांना बळकटी येईल आणि एनर्जेटीक वाटेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

5 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

19 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

19 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

19 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

19 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

19 तास ago