आरोग्य

आपलं अमूल्य रक्त

शरीरात कोणतीही प्रक्रिया होण्यामागे रक्त हे महत्त्वाचं काम करते. रक्त शरीराचे संतुलन बनवून ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. जर शरीरातील रक्त कमी झाले किंवा शरीर रक्ताचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरले, तर ते घातक ठरू शकते.

डायबिटीस हा आजार रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्यानेच होतो, आणि तो अत्यंत घातक असतो. ज्यांचा डायबिटीस जास्त असतो त्यांना इन्शुलिनची ईंजेक्शन थेट घ्यावी लागतात. तसेच रक्तातल्या प्लेटलेट्स चे प्रमाण कमी झाल्याने देखील बरेच आजार उद्भवू शकतात. तंदुरुस्त माणसात एवढे रक्त असते की, तो दर तीन महिन्यात रक्तदान करू शकतो आणि शरीर पुन्हा तीन महिन्यात या रक्ताची उणीव भरून काढते. रक्ताची गरज काय असते, हे जेव्हा आपल्याला त्याची गरज असते आणि वेळेवर ते मिळत नसते, तेव्हाच समजते. नेहमी रक्ताच्या बाबतीत एवढेच ऐकले असेल की, रक्त हे लाल असते आणि शरीरात जवळपास ७०% रक्त असते. रक्ताच्या बाबतीत काही अजून जाणून घेऊया.

१) पहिल्यांदा रक्ताचे हस्तांतरण दोन कुत्र्यांमध्ये १६६७ रोजी केले गेले होते.

2) जगातील पहिली रक्त पेढी १९३७ रोजी बनवण्यात आली होती.

३) शरीरातील रक्ताचा ७०% भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन मध्ये असतो. ४% भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५% भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंड मध्ये असते आणि उरलेले १% रक्त प्लाजमाच्या तरल अंश व कोशिकांच्या एंजाइम्स मध्ये असते.

४) १ मिली रक्तात १०,००० पांढऱ्या रक्तपेशी आणि २,५०,००० प्लेटलेट्स असतात.

५) शरीरातील नसात ४०० किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते.

६) रक्त कोशिकांना संपूर्ण शरीरात फिरण्यास ३० सेकंद लागतात. या रक्त कोशिका २० सेकंदात १२००० किमी अंतर पार करू शकतात.

७) जर शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त ३० मीटर पर्यंत उडू शकते.

८) मनुष्याचे रक्त फक्त ४ प्रकारचे (O, A, B, AB) असते. पण गाईत जवळपास ८००, कुत्र्यात १३ आणि मांजरात ११ प्रकारचे रक्त पाहण्यास मिळते.

९) नुकत्याच जन्मलेल्या बालकात फक्त १ कप (२५० एमएल) रक्त असते आणि तरुण माणसात जवळपास ५ लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या ७% रक्त असते.

१०) आतापर्यंत कृत्रिम रक्त बनवले गेले नाही.

११) लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड संपवतात.

१२) पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्या पासून वाचवतात.

१३) प्लाजमा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठवण्या पासून वाचवते.

१४) प्लेटलेट्स हे रक्ताला गोठ्ण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्या नंतर, काही वेळ रक्त आल्या नंतर, रक्त येण्याचे बंद होते.

१५) गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत.

1६) शारीरिकदृष्ट्या एकाच वेळी लघवी करणे आणि रक्तदान करणे शक्य नाही.

१७) जेम्स हॅरीसन नावाच्या व्यक्तीने गेल्या ६० वर्षा मध्ये १००० वेळा रक्तदान केले आणि २० लाख लोकांचे प्राण वाचवले.

१८) प्रत्येक दिवशी जगात ४०००० युनिट रक्ताची गरज असते. ३ पैकी १ व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी रक्ताची आवश्यकता नक्कीच पडते.

१९) स्वीडन मध्ये जेव्हा कोणी रक्तदान करते, तेव्हा त्याला ‘Thank You’ असा मॅसेज केला जातो आणि असाच मॅसेज जेव्हा त्याचे रक्त एखाद्याच्या कामी येते, तेव्हा देखील केला जातो.

२०) जपान मध्ये लोक रक्त गटावरूनच माणसाच्या व्यक्तित्वाचा अंदाज लावतात.

2१) ब्राझील देशात बोरोरो नावाचा आदिवासी समूह आहे, आणि या समूहातील सर्व लोकांचा एकच ‘O’ रक्तगट आहे.

२२) जवळपास सर्वात लाल रंगाचे रक्त पाहण्यास मिळते, पण कोळी आणि गोगलगाय मध्ये हलक्या निळ्या रंगाचे रक्त पाहण्यास मिळते.

२३) शरीरात जवळपास ०.२ मिलिग्रॅम एवढे सोने असते आणि याचे सर्वात जास्त प्रमाण रक्तात आढळून येते. ४०,००० लोकांच्या रक्तामधून जवळपास ८ ग्रॅम सोने काढले जाऊ शकते.

२४) फक्त मादी मच्छरच माणसांचे रक्त शोषून घेते, नर मच्छर हे शाकाहारी असतात आणि ते फक्त गोड द्रव पदार्थ पितात. मादी मच्छर या आपल्या वजनाच्या तीनपट जास्त रक्त पिऊ शकतात.

२५) तुम्हाला वाटत असेल कि, मच्छर फक्त थोडंच रक्त पितात, मात्र १२ लाख मच्छर तुमचे पूर्ण रक्त पिऊ शकतात. मच्छर ‘O’ रक्तगटाचे रक्त पिणे अधिक पसंत करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

1 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

1 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

19 तास ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

19 तास ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

19 तास ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

19 तास ago