मुख्य बातम्या

राज्यमाता गोमाता संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांनी सहभागी व्हावे; प्रतीक बनकर

शिरूर (अरुणकुमार मोटे): पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ या राज्यव्यापी उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा राबविण्यात येत असून, गोसंवर्धन आणि गोसेवेबाबत जनजागृती करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

पुणे जिल्हा समन्वयक प्रतीक बनकर हे जिल्ह्यातील विविध शहर, गाव आणि ग्रामीण भागात दौरे करून नागरिकांशी संवाद साधत आहेत. गोप्रेमी, शेतकरी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच युवकांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या यात्रेच्या माध्यमातून गोवंशाचे संरक्षण व संवर्धन, गोशाळांचे सक्षमीकरण, शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकरी व गोप्रेमींपर्यंत पोहोचविणे, तसेच दुग्ध व्यवसाय आणि सेंद्रिय शेतीला चालना देणे यावर भर दिला जात आहे. राज्यातील गोशाळा, पशुपालक आणि शेतकरी यांच्यासमोरील अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठीही संवाद साधला जाणार आहे.

या राज्यव्यापी मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

यावेळी बोलताना प्रतीक बनकर म्हणाले, “राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ही केवळ जनजागृती मोहीम नसून गोसेवा, गोसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी लोकचळवळ ठरत आहे. गोवंश संवर्धन, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार यासाठी ही यात्रा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.”

पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिक, गोप्रेमी, शेतकरी, युवक आणि सामाजिक संस्थांनी या संवाद यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गोसंवर्धनाच्या कार्याला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago