आरोग्य

जाड फुगलेल्या पोटऱ्या कमी करा, पाहा अगदी सोपे उपाय

दिवसभर काम केल्यानंतर महिलांच्या शरीराचा प्रत्येक अवयव दुखतो. ऑफीसचे काम, घरचे काम, मुलांची काळजी, घरच्यांची काळजी, धुणी भांडी या सगळ्या गोष्टीत वेळ कधी निघून जातो कळतही नाही. मात्र जरा अंग टेकलं की दिवसभराची धावपळ शरीराला जाणवते. हात, पाय, डोकं बोलायला लागते. पायाला त्रास जरा जास्त जाणवतो. दिवसभर उभ्याने काम करणार्‍यांसाठी तर पायाची काळजी घेणे फार गरजेचे असते. तळवा, मांडी आणि पोटरी सारेच दुखते. तुमचीही पोटरी सारखी दुखते का?

आजच्या धावपळीच्या जीवनात असे पोटऱ्या दुखणे, ही अगदीच सामान्य तक्रार झाली आहे. अनेकांना हा त्रास होतो. अनेक वेळा या त्रासाकडे दुर्लक्ष केले जाते. खास म्हणजे महिलांकडून. महिला अशा त्रासांकडे कधीच फार लक्ष देत नाहीत. दुसर्‍यांची लाख काळजी घेतात, मात्र स्वत:ची नाही. पोटऱ्या नक्की का दुखतात. त्यामागे नेमकी कोमती असतात हे समजून घेणे आणि योग्य उपाय करणे आवश्यक आहे. याचबरोबर, पोटऱ्यांची चरबी कमी करणे आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. मग वजन जास्त वाईट तसेच अति व्यायामही वाईटच. काही जणांचे वजन त्याच्या पायांना पेलवत नाही. त्यामुळे पोटरीवर ताण येतो. स्नायूंना त्रास झाला की पोटऱ्या दुखतात. त्याविरुद्ध काही जण फिटनेस फ्रिक असतात. ते व्यायाम जरा प्रमाणापेक्षा जास्त करतात. शरीराला क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करायला लागला तरी पोटऱ्यांवर ताण येतो. उपाय अगदी सोपा आहे. व्यायाम प्रमाणात करा आणि वजन फार जास्त असेल तर ते कमी करा.

पायाच्या दिशेने रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तरी पोटऱ्यांवर ताण येतो. शरीरात पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असल्यास स्नायू आखडतात. त्यामुळे वेदना जाणवतात. शरीरातील पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कमी झाल्यास पोटऱ्यांमध्ये कळ जाते. सतत उभं राहून काम करणाऱ्यांच्या पोटऱ्या फार थकतात. त्यामुळेही वेदना वाढतात. गरम पाण्याचा शेक घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. सायकलिंग करा. पोटऱ्या मजबूत होतात.

पोटऱ्याची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायाम करा. तसेच धावणे, चालणे, झुंबा, स्क्वॉट्स मारणे बैठका मारणे, असे व्यायाम करा. सायकल चालवा. पोटऱ्यांसाठी सगळ्यात मस्त व्यायाम म्हणजे सायकल चालवणे. पायाला तेलाने मालीश करायचे. त्यामुळे स्नायू मोकळे होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

13 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago