आरोग्य

फ्रिजचं गारेगार पाणी करू शकतं तुम्हाला आजारी, वाचा त्यापासून होणारे नुकसान

आता उन्हाचा पारा वाढायला सुरूवात झाली असून बरेच लोक फ्रीजमधील पाणी प्यायला सुरूवात करण्याच्या तयारीत असतील. कारण फ्रिजमधील थंड पाण्यानं आराम मिळतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे फ्रिजमधील थंड पाणी पिऊन आत्मा आणि शरीर थंड करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिणं म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्यासोबत खेळ करण्यासारखं आहे. अशात थंड पाणी पिण्यानं काय नुकसान होतात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.

पोट बिघडत 

थंड पाणी प्यायल्यामुळं पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा तुम्ही उन्हातून घरात येता आणि लगेच थंड पाणी पिता तेव्हा आतड्या आकुंचन पावतात. अशात तुम्हाला पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या होतात.

हार्ट रेट कमी होतो

सामान्यपणे गरमीच्या दिवसांमध्ये साध्या पाण्यानं तहान जात नाही. सतत थंड पाणी प्यावं वाटतं. मात्र, सतत थंड पाणी प्यायल्यानं हृदयाची गती कमी होते आणि यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो.

पचनक्रिया बिघडते

थंड पाणी हे पचनक्रिया बिघडवण्याचं काम करतं. काही खाल्ल्यावर थंड पाणी प्यायल्यावर पचनासाठी आवश्यक अग्नि विझते आणि त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही. अशात पोटासंबंधी समस्याही होतात.

डोक दुखत

सतत थंड पाणी प्यायल्यानं ब्रेन फ्रीजची समस्याही होऊ शकते. थंड पाणी पिण्यावर करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, थंड पाणी नसांमध्ये पोहोचलं की, मेंदुला एक संदेश देतं. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ लागते.

कमजोरी आणि थकवा

थंड पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म सिस्टीम स्लो होतं. ज्यामुळे शरीर फॅट योग्यपणे रिलीज करू शकत नाही. अनेक हे कमजोरी आणि थकव्याचं कारण ठरू शकतं.

कफ होतो

जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्यानं शरीरात कफ तयार होतो. जेव्हा शरीरात जास्त कफ तयार होतो तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. याच कारणानं सर्दी खोकला वाढतो. त्यामुळे जेवण केल्यावर थंड पाणी पिऊ नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago