तुम्ही जर ८० किंवा ९० च्या काळातील जन्मलेले असाल तर तुम्हाला आठवत असेल की, न्हाव्याकडे दाढी केल्यानंतर तो तुमच्या चेहऱ्यावर तुरटी फिरवत होता. कारण त्यावेळी आफ्टर शेव क्रिम किंवा जेल तेवढे मिळत नव्हते. तुरटीने चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच सोबतच याने सुरकुत्या आणि त्वचेवरील डागही दूर होतात. तुम्ही जर महानगरामध्ये राहणारे असाल तर तुम्हाला याची काहीच कल्पना नसेल. तुरटीचे त्वचेला अनेक फायदे होतात. त्यामुळेच पुरूषांनी कोणत्या ५ कारणांसाठी तुरटी त्यांच्या बाथरूममध्ये ठेवावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुरटीचे फायदे
१) नॅचरल आफ्टर शेव
शेविंग केल्यानंतर तुम्ही तुरटीचा वापर आफ्टर शेव म्हणून करू शकता. दाढी करताना झालेली जखम याने लगेच भरून निघते आणि त्वचाही चांगली होते.
२) नॅचरल टोनर, सूज कमी करत
तुरटी त्वचेला टोन करण्याचं काम करते. याने त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे चेहराही स्वच्छ आणि तजेलदार दिसू लागतो. बाजारातील केमिकल्सयुक्त टोनरचा वापर करण्या ऐवजी तुरटी कधीही बेस्ट ठरते. कारण याने काहीच साइड इफेक्ट्स होत नाहीत. तसेच याने चेहऱ्यावरील सूज आणि पुरळही दूर होते.
३) तोंडातील फोडंही दूर होतात
माऊथ अल्सर म्हणजे अनेकदा लोकांना तोंडात फोडं येतात. ही फोडं दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. फोडावर तुरटीचं थोडं पावडर काही सेकंदासाठी लावून ठेवा, नंतर पाण्याने गुरळा करा. २-३ वेळा हा उपाय केल्यावर तुम्हाला आराम मिळेल.
४) तोंडाची दुर्गंधी
तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना असते. अशात चिमुटभर तुरटी पावडर आणि काळं मीठ एक ग्लास पाण्यात टाका. या पाण्याने दिवसातून दोन वेळा गुरळा करा. याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होईल.
५) डार्क सर्कल
झोप पूर्ण न झाल्याने अनेकदा डोळ्यांखाली काळे डाग दिसतात. हे डाग दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. यासाठी थोडं तुरटी पावडर पाण्यात मिक्स करू डागांवर लावा. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवून घ्या. डार्क सर्कल कमी झालेले दिसतील.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…