आरोग्य

काँग्रेसच्या नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे ७ व ८ ऑगस्टला टिळक भवनमध्ये निवासी शिबीर

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिनांक ७ व ८ ऑगस्ट २०२५ रोजी पक्षाचे दादर येथील मुख्यालय टिळक भवन येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे शिबीर आयोजित केले आहे. हे दोन दिवसीय निवासी शिबीर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून पक्ष संघटना मजबूत करण्यास प्राधान्य दिले आहे. दिनांक ४ जून २०२५ व २६ जून २०२५ रोजी निवड समितीसमोर मुलाखती घेऊन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्वच ५५३ ब्लॅाक अध्यक्षांचे शिबिर घेण्याचे प्रदेशाध्यक्षांनी ठरविले असून पहिल्या टप्प्यात नवनियुक्त ब्लॅाक अध्यक्षांचे शिबिर पार पडणार आहे. त्यांनंतर टप्प्याटप्याने सर्वांचे शिबिर होणार आहे.

7 ऑगस्ट रोजी सकाळी या शिबिराची सुरुवात होणार असून दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शिबिराची सांगता होणार आहे. काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळात पोहचवणे, पक्ष संघटन मजबूत करणे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यातील विविध सामाजिक, राजकीय मुदद्यांवर या शिबिरात ऊहापोह केला जाणार आहे. नेते व विविध क्षेत्रातील वक्ते या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

12 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

12 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

12 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

16 तास ago