मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा
मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाच्या नेत्यांनी आकांडतांडव सुरू केले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेस नेत्यांबद्दल कोणत्या भाषेचा वापर करतात, याचा भाजपाला विसर पडला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे चारित्र्यहनन करण्यात मोदी-शाह यांच्यापासून गल्लीतील नेत्यांपर्यंत कोणीही मागे नाही. त्यामुळे दुसऱ्यांचे चारित्र्यहनन करणाऱ्यांनी काँग्रेसला संस्कृती आणि संस्कार शिकवू नयेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार पलटवार केला.
मोदींच्या वक्तव्यांचा दाखला देत भाजपाला घेरले
यासंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभांमधून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्याबद्दल ‘शूर्पणखा’, तर इतर महिला नेत्यांबद्दलही अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आला. ममता बॅनर्जी यांच्याबाबतही मोदी यांनी ‘दीदी ओ दीदी’ असा उल्लेख केला होता. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यांचाही त्यांनी उल्लेख केला.
मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणाचे कथित शुद्धीकरण करण्यात आले, तेव्हाही भाजपाने मौन बाळगले होते, असा आरोप सपकाळ यांनी केला. दुसऱ्यांच्या संस्कृतीवर बोट ठेवण्यापूर्वी भाजपाने स्वतःच्या वर्तनाचे आत्मपरीक्षण करावे. ज्या पक्षाचे सर्वोच्च नेतेच जाहीरपणे खालच्या पातळीवरील भाषा वापरतात आणि महिलांबद्दल अपमानकारक वक्तव्ये करतात, त्यांनी काँग्रेसला संस्कृतीचे धडे देऊ नयेत, असेही ते म्हणाले.
‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट’
खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाची संपूर्ण इकोसिस्टिम सक्रिय झाली आहे. भाजपाची भूमिका म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी दुटप्पी आहे, अशी टीका करत सपकाळ यांनी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अपयश झाकण्यासाठी भाजपाकडून मुद्द्यांचे राजकारण
भाजपाचे सरकार गेल्या १३ वर्षांपासून सत्तेत असून, हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेसमोर मांडण्यासाठी ठोस कामगिरी नसल्यामुळे भाजपा अशा मुद्द्यांना महत्त्व देऊन राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
एपस्टिन फाईल्सच्या संदर्भातही सपकाळ यांनी भाजपावर निशाणा साधला. या प्रकरणात मोदी सरकारमधील काही मंत्र्यांची नावे आल्याचा दावा करत त्यांनी भाजपाला लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी मोदी, शाह आणि भाजपाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणले असल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कोणत्याही मुद्द्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र जनता सुज्ञ असून ती भाजपाच्या राजकारणाला योग्य उत्तर देईल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…
गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…
शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…