‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन

नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला नवी गती मिळत असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा सर्वांगीण कायापालट होणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गंगापूर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच कर्मवीर अॅडव्होकेट बाबुराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

‘चांगले रस्ते ही शहराच्या प्रगतीची ओळख’

गंगापूर येथील रस्त्याच्या कामामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले. “चांगले रस्ते ही शहराच्या प्रगतीची ओळख असते. आपण स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत,” असे ठामपणे सांगत त्यांनी विकासकामांच्या गुणवत्तेवर भर दिला.

रस्त्याचे काम दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण झाले पाहिजे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंहस्थासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यासाठी सरकारने आतापर्यंत सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार असून, त्यानंतर सिंहस्थाच्या तयारीला अधिकृतपणे गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले. देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी आणि सुविधांसाठी शहर सज्ज होणे आवश्यक आहे. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असून, या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिककरांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे.राज्यात दुष्काळाचे संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत देण्याबरोबरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीलाही प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार बळ

कर्मवीर अॅडव्होकेट बाबुराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन करताना शिंदे यांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले. ११२ वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली असून, आज लाखो विद्यार्थी संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा लाभ घेत आहेत, असे ते म्हणाले.

खेड्यापाड्यांतून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुविधायुक्त आणि घरासारखे वातावरण उपलब्ध करून देण्यात नवीन वसतिगृह महत्त्वाची भूमिका बजावेल. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेताना मदत होईल आणि त्यांची इंजिनिअर होण्याची स्वप्ने साकार करण्यासाठी बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव तपासणार

नाशिकच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेग आणि पारदर्शकता राखण्याचे आवाहन करताना शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतही भूमिका स्पष्ट केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच संत कबीरनगर झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव तपासून गृहनिर्माणाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार गोकुळ गीते, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, संस्थेचे विश्वस्त, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

1 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

3 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

3 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

3 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

8 तास ago