वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव
हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. जास्त तापमान वाढल्यानं शरीर स्वत:ला थंड ठेवू शकत नाही. ज्यामुळे आतलं तापमान वाढतं. अशात हार्ट रेट वाढतो आणि यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
ब्लड फ्लो
हीट स्ट्रोकमुळे शरीराचं तापमान वाढू शकतं. हीट स्ट्रोक अशी कंडीशन आहे ज्यात आपल्या वातावरणाचं तापमान इतकं वाढतं की, आपलं शरीर स्वत:ला थंड करू शकत नाही. त्यामुळे ब्लड फ्लो स्लो होतो. तापमान वाढल्यानं रक्त घट्ट होतं. ज्यामुळे ब्लड फ्लो करण्यासाठी हृदयावर जास्त दबाव पडतो. याचकारणानं स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
कुणाला जास्त धोका
हृदयासंबंधी समस्या आधीच असलेल्या लोकांना वाढत्या तापमानापासून अधिक असतो. त्याशिवाय वृद्ध लोकांना याचा धोकाही अधिक असतो. अशात हृदयरोग असलेल्यांनी वाढत्या तापमानात हृदयाची काळजी घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कधी घ्याल काळजी
वाढत्या तापमानात स्वत:ची काळजी घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब ठरते ती म्हणजे शरीर हायड्रेटेड ठेवणं. यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्यावे आणि सोबतच दही, लस्सी, ताक प्यावे व कलिंगड, काकडी आणि खरबूज अशी फळं खावीत.
तेलकट खाणं टाळा
हृदय निरोगी ठेवण्यासाठी गरम आणि तेलकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तेकलट पदार्थांऐवजी मोड आलेले कडधान्य, उकडलेल्या भाज्या खायल्या हव्यात.
विनाकारण बाहेर जाणं टाळा
फार काही महत्वाचं काम नसेल तर दुपारच्या वेळी बाहेर जाणं टाळलं पाहिजे. कारण यावेळी तापमान जास्त असतं. बाहेर जायचंच असेल तर दुपट्टा, रूमाल बांधून जायला हवं.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…
मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले…