महाराष्ट्र

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेला झाडीत ढकलून तिच्या नाकाला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. उत्तर प्रदेशातील मथुरा येथील गोवर्धन परिक्रमा मार्गावर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नाव मोनिका रैना असून त्या मुंबईच्या रहिवासी असल्याची माहिती आहे. गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून त्या गोवर्धन परिक्रमा करत असून राधाकुंड परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास एक भिकारी मोनिका यांच्याजवळ आला आणि त्याने भिक्षा मागितली. मात्र, मोनिका यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी त्यांचा पाठलाग करू लागला. महिलेने पुन्हा भिक्षा देण्यास नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

आरोपीने महिलेला खाली ढकलून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने महिलेच्या नाकाला चावा घेतला. या हल्ल्यात मोनिका यांच्या नाकाला खोल जखम झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिक्रमा मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. प्राथमिक माहितीनुसार आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.या घटनेमुळे गोवर्धन परिक्रमा मार्गावरील भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

6 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

6 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

6 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago

‘आशीर्वादाचा दिवा’ नव्हे, मोदींचा वाढदिवस देशासाठी ‘काळा दिवस’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले…

6 तास ago