महाराष्ट्र

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध विषयांसह राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली.यावेळी नितीन नबीन यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी राज्यातील विविध घडामोडी आणि विकासकामांबाबत संवाद साधला.

या भेटीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, मंत्री मंगल प्रभात लोढा, युवा नेते खासदार पार्थ पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार संजय बनसोडे आदी उपस्थित होते.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

6 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

6 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

6 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago

‘आशीर्वादाचा दिवा’ नव्हे, मोदींचा वाढदिवस देशासाठी ‘काळा दिवस’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले…

6 तास ago