कसे आहे तेल फायदेशीर
निलगिरीच्या तेलामध्ये अॅन्टीसेप्टीक तसेच अॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त ठरते. तसेच वेदना कमी करण्यासही मदत होते. सोबतच सर्दी-पडशाचा त्रास, श्वसनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नाक चोंदल्याने होणारी कानदुखी कमी करण्यासही निलगिरीचे तेल फायदेशीर ठरते.
मग कसे वापराल निलगिरीचे तेल
मसाज: कानाच्या बाहेरील भागावर निलगिरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. तसेच वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच कानात साचलेला मळ मोकळा होण्यासही मदत होते. मात्र त्यासोबत खोबरेल तेल मिसळून मानेकडे खालच्या बाजूला मसाज करा.*
वाफ घेणे: सर्दीमुळे किंवा नाक चोंदल्याने कान दुखत असल्यास वाफ घेणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी गरम पाण्यात 4-5 निलगिरीच्या तेलाचे थेंब टाका. डोकं जाड चादरीने किंवा टॉवेलने झाका. हळूहळू श्वास घ्या. श्वास घेताना नाक मोकळे होईल. परिणामी कानदुखीचा त्रासही कमी होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…