आरोग्य

हळदीचे अनेक औषधी फायदे

रामबाण उपाय

हळदीचे अनेक औषधी उपयोग आहेत. सध्या तर तिच्यावर भरपूर संशोधन चालू आहे. तिच्यातील कुरक्युमीन हे उत्तम अँन्टिऑक्सिडंट आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यासारख्या व्याधी होऊ न देण्यासाठी तसेच झाल्यास नियंत्रित ठेवण्यासाठी हळदीचा उत्तम उपयोग होऊ शकतो. हल्लीच्या संशोधनानुसार वार्धक्यात होणार्‍या विस्मरणासारख्या आजारावर म्हणजे अल्झायर्मसवर तिचा उत्तम उपयोग होण्याची शक्यता आहे. इतर देशांशी तुलना करता भारतात या रोगाचं प्रमाण खूप कमी आहे याचं कारण कदाचित आपल्या अन्नातला रोजचा हळदीचा सहभाग हे असू शकेल. मेंदूमध्ये अँमीलॉइड थर बसल्यानं चेतापेशीचं कार्य खंडित होतं. त्यामुळे हा रोग होतो असं मत आहे. संशोधकांच्या मते कुरक्युमिन मेंदूमध्ये असे थर होण्यास अडथळे आणत. त्यामुळे या रोगावर हळद उपयोगी ठरेल.

सांध्यामध्ये आणि स्नायुंमध्ये वेदना आणि ताठरपणा निर्माण करणार्‍या संधीवातावरील उपचारात हळदीचा उपयोग आयुर्वेदात केला जातो.

हळदीमध्ये सूक्ष्मजंतुनाशक गुणधर्म आहेत. त्यामुळेच आपल्याकडे पूर्वीपासून कापलं किंवा खरचटलं की त्यावर लगेच हळद लावण्याची पद्धत आहे. यकृताच्या कार्यासाठी आणि रक्ताभिसरणासाठी ती अतिशय उत्तम समजली जाते. चिनी वैद्यक शास्त्रात हळदीचा उपयोग नैराश्यावरील उपचारांमध्ये केला जातो. गरम दुधात हळद घालून पिणं हा खोकल्यावर उपचार म्हणून केला जातो.

‘पी हळद हो गोरी’

त्वचेसाठी हळद अतिशय उत्तम समजली जाते. डाळीच्या पिठात हळद घालून आणि दूध मिसळून त्याची पेस्ट बनवून ती चेहर्‍याला, अंगाला लावली की त्वचेवरील मृतपेशी निघून जातात. ही पेस्ट चेहर्‍यावर, अंगावर लावली की थोडावेळ ठेवून मग धुवून टाकायची असते. मृतपेशी निघून गेल्यानं त्वचेतील रंध्र मोकळी होतात. त्वचा टवटवीत, मऊ होते. हळदीमुळे त्वचेवर एक प्रकारचा तजेला चढतो. म्हणजेच त्वचा ‘सोन्यासारखी तेजस्वी’ दिसू लागते.

हळदीचे औषधी उपयोग

१. जंतांवरही हळद हे एक साधे पण प्रभावी औषध आहे.

२. महिनाभर रोज सकाळी अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा वावडिंग हे मिश्रण मधाबरोबर घेतले व त्यानंतर एका दिवशी गंधर्वहरीतकी किंवा एरंडेल घेऊन जुलाब करवला तर जंत पडून जाण्यास मदत मिळते.

३. कुठेही जखम झाली की त्यावर हळदीचे चूर्ण दाबून धरले की रक्‍तस्राव तर थांबतोच, पण जंतुसंसर्ग न होता जखम सहजपणे भरून येण्यास मदत मिळते.

४. डोळे येतात त्यावर हळदीच्या काढ्याने डोळे धुणे प्रशस्त असते. यामुळे डोळ्यांची आग, लालसरपणा, सूज तसेच डोळ्यांतून येणारा स्राव कमी होतो.

५. शरीरावर कुठेही मुका मार लागला किंवा एखादा शरीरभाग मुरगाळला व त्या ठिकाणी सूज आली तर हळकुंड व आंबेहळद उगाळून तयार केलेले गंध गरम करून लावण्याने लगेच बरे वाटते.

६. चेहऱ्यावर तारुण्यपीटिका, पुटकुळ्या, पुरळ, काळे डाग येत असल्यास हळकुंड व चंदन उगाळून लेप करण्याचा उपयोग होतो. लेप लावल्यावर तो पूर्ण सुकण्यापूर्वीच काढून टाकणे चांगले.

७. भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाच्या आधी नवरदेव-नवरीच्या अंगाला हळद लावण्याची पद्धत आहे. यामागे हळदीमुळे त्वचा शुद्ध व्हावी, उजळावी हाही एक मोठा उद्देश असतो. म्हणूनच एरवीसुद्धा स्नानाच्या वेळी साबणाऐवजी हळद, मसुराचे पीठ व दुधावरची साय किंवा दही हे मिश्रण अंगाला लावणे उत्तम असते. यामुळे अति प्रमाणात घाम येणे सुद्धा कमी होते.

८. चेहऱ्याची त्वचा सैल पडली असेल, रखरखीत होत असेल तर हळद व लोणी एकत्र करून लावून ठेवण्याचा उपयोग होतो.

९. रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा हळदीचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्यास अतिरिक्‍त चरबीचे प्रमाण घटण्यास मदत मिळते.

१०. त्वचारोगांमुळे जेव्हा असह्य कंड सुटते तेव्हा हळकुंड खोबरेल तेलात उगाळून त्याचा लेप करण्याने बरे वाटते.

११. जिभेला चव नसेल, तोंडाला वास येत असेल, तोंडात चिकटा जाणवत असेल तेव्हा हळकुंडाच्या काढ्याने गंडुष करण्याचा म्हणजे काढा तयार झाला की तोंडात चूळ धरून ठेवल्याप्रमाणे १० मिनिटांसाठी धरून ठेवण्याचा उपयोग होतो.

१२. खोकला होऊन कफ पडत असेल अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी हळकुंडाचा छोटा तुकडा भाजून घेऊन चावून खाणे चांगले असते.

१३. हळद बाळंतिणीसाठी उत्तम असते. गर्भाशय पूर्ववत व्हावे, गर्भाशयाची ताकद वाढावी, जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी बाळंतिणीच्या आहारात हळदीचा समावेश असावा.

१४. हळद स्तन्यशुद्धीसाठी उत्तम असते. म्हणून बाळ अंगावर दूध पीत असेपर्यंत बाळंतिणीला हळदीचे सेवन करत राहावे.

१५. कोणत्याही प्रकारे विषबाधा झाली असता दोन आठवड्यांसाठी अर्धा चमचा हळद तुपाबरोबर सेवन करण्याची पद्धत आहे.

१६. कानातून पाणी किंवा पू येत असेल तर हळद, वावडिंग व वेखंड यांची धुरी घेण्याचा उपयोग होतो.

१७. भूक लागत नसली, तोंडाला चव नसली तर ओली हळद, आले, लिंबाचा रस व मीठ घालून केलेले लोणचे खाण्याचा उपयोग होतो.

१८. मधुमेही व्यक्‍तींनी अर्धा चमचा हळदीचे चूर्ण आवळ्याचा रस व मधाबरोबर घेण्याचा उपयोग होतो. पाव चमचा हळद व पाव चमचा दालचिनी चूर्ण एकत्र करून रोज सकाळी गरम पाण्याबरोबर घेणेही मधुमेहावर उपयोगी असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

1 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

1 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago