आरोग्य

कॅल्शियमचा खजिना आहेत तीळ, पण ते खाण्याची योग्य पद्धत कोणती

हल्ली कमी वयातच पाठ, कंबर, गुडघे दुखू लागतात. त्यासाठी इतर अनेक घटकही जबाबदार आहेत. पण या दुखण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता.

आता कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक जण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात. पण आपल्या घरात पांढऱ्या तिळाच्या रुपात कॅल्शियमचा मोठा खजिना असताना विनाकारण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं कितपत योग्य याचा विचार प्रत्येकानेच करावा.

तुमच्या शरीराला असणारी कॅल्शियमची गरज पांढऱ्या तिळाच्या माध्यमातून पुर्ण होऊ शकते. पण त्यासाठी ते तीळ नेमके कोणत्या पद्धतीने खायला पाहिजेत याविषयीची खास माहिती डॉक्टरांनी drirfan94 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यामध्ये डॉक्टर सांगतात की पांढरे तीळ थोडेसे खमंग भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करा.

एक ग्लास दुधामध्ये १ चमचा तिळाची पावडर टाकून दूध प्या. लहान मुलांना सकाळ संध्याकाळ असे दूध दिले तर खूपच चांगले. वाढत्या वयासोबत मुलांना कधीही कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्याची गरज पडणार नाही. शरीराची कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच जण या पद्धतीने दूध पिऊ शकतात, असं डॉक्टर सांगतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

17 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

18 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

23 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago