आरोग्य

शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स

शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपचा दररोज वापर केला जातो. मात्र आता एका नवीन रिसर्चमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शाम्पू, बॉडी लोशन, साबण आणि आयलॅश ग्लूसारख्या पर्सनल केअर प्रोडक्टमध्ये फॉर्मल्डिहाइडसारखे केमिकल्स असतात जे शरीरात फॉर्मल्डिहाइड सोडतात.

या केमिकल्सचा कॅन्सरच्या धोक्याशी संबंध आहे आणि त्याचा सततचा वापर गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या ७० महिलांवर हे संशोधन करण्यात आलं, ज्यामध्ये असं आढळून आलं की, यापैकी ५३% महिला नियमितपणे अशा उत्पादनांचा वापर करत होत्या.

एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी सहभागींना अॅप वापरून त्यांच्या उत्पादन लेबलचे फोटो सबमिट करण्यास सांगितले. विश्लेषणानंतर असं आढळून आलं की, ५८% केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये फॉर्मल्डिहाइड सोडणारे केमिकल्स असतात.

आपण दररोज वापरणाऱ्या पर्सनल केअर प्रोडक्टमध्ये हे केमिकल्स असतात. वारंवार संपर्कामुळे गंभीर नुकसान होऊ शकतं. ग्राहकांना हे केमिकल्स ओळखणं कठीण होतं कारण लेबलवर लिहिलेली नावं समजत नाहीत. उदाहरणार्थ, DMDM Hydantoin हे एक केमिकल आहे जे शरीरात फॉर्मल्डिहाइड सोडतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

2 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

2 तास ago

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…

2 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा…

2 तास ago

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी…

6 तास ago

केसांचे आरोग्य आणि केसगळती

अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या…

6 तास ago